Mughal History Taj OTT Series : मुघल इतिहास (Mughal History) हे न सुटलेले एक कोड आहे. त्याचा इतिहासात अनेक Dark Secrets आजही अनेकांना गोंधळत टाकतात. पण या मुघल इतिहासातील जलालुद्दीन अकबर आणि जोधा यांची लव्ह लाइफ आणि दुसरं सलीम अनारकली यांचं प्रेम प्रकरण हे प्रत्येकाला माहिती आहे. पण जलालुद्दीन अकबरच्या आयुष्यातील ती एक बाजून अनेकांना माहिती नाही. Zee5 वर प्रदर्शित झालेली Taj- Divided By Blood ही वेब सीरीज (Taj OTT Series) पाहून आज अनेक जण गोंधळला आहे. या सीरीजमध्ये मघुल काळातील असे असे सत्य समोर आले आहे. ते पाहून प्रेक्षक हैराण झाले आहेत. 


नेमकी कोण होती Anarkali?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही सीरीज पाहण्या पर्यंत प्रत्येकाला असंच वाटायचं की सलीम आणि अनारली यांचं प्रेम होतं. मोहक रुप, उत्कृष्ट नृत्यांगना अशा सौंदर्यवतीच्या प्रेमात सलीम अडकला होता. अकबरला या दोघांचे प्रेम मान्य नव्हते म्हणून अनारकलीला भिंती चिणुन मारले. हेच आजपर्यंत अनेकांना माहिती आहे. अभिनेत्री मधुबाला आणि दिलीपकुमार यांचा मुघल ए आझम या चित्रपटातून अनाकली आणि सलीमची लव्ह स्टोरी  (Salim Anarkali love story) सगळ्यांना मनात आजही आहे. हेच सत्य प्रत्येक जण घेऊन चालत आहे. पण याच एक मोठ रहस्य दडलं आहे. 


सावत्र आईच्या प्रेमात सलीम?


अनारकली ही सलीमची सावत्र आई होती. हो, हे रहस्य उघड झालं आहे, Taj- Divided By Blood या वेबसीरीजमधून...यात अनारकली ही अकबर यांची चार पत्नी पैंकी एक होती. अकबर आणि अनारकलीला एक मुलगादेखील होता. अकबर यांचा तिसरा पुत्र हा दानियालची अनाकली आई होती. दानियालला हे कधीच माहिती नव्हतं.  अकबरने अनारकलीला हॅरेममध्ये कैदीत ठेवलं होतं. त्या ठिकाणी एकदा सलीम पोहोचला आणि अनारकलीच्या सौंदर्याचा जाळ्यात अडकला. यानंतर मुघल सल्तनतमध्ये खळबळ उडाली. 


इतिहास काय सांगतो?


सलीम आणि अनारकलीच्या प्रेमकथेवर चित्रपटांपासून इतिहासाच्या पुस्तकांपर्यंत बरंच काही लिहिलं गेलं आहे. अनारकली आणि सलीमच्या प्रेमकथेला अमर करण्यात आसिफच्या 'मुघल-ए-आझम' या चित्रपटाचा मोठा वाटा आहे.सम्राट अकबर असा राजा म्हणून प्रसिद्ध होता. ज्याने केवळ राजपूत जोधाबाईशी विवाह केला नाही तर हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन, प्रत्येक धर्मासाठी समान हक्कांचा पुरस्कार केला. परंतु या सर्व विषयांमध्ये अनारकली हे एक असं नाव आहे, ज्यामध्ये इतिहासकारांना खूप रस आहे. विशेष म्हणजे अनारकलीचे आयुष्य हे एका गुपितासारखे आहे. अनारकली, अकबर आणि सलीम यांच्याबद्दल इतिहास काय सांगतो ते जाणून घेऊयात. (Who was Anarkali Salims girlfriend or Akbars Begum Know the complete history anarkali salim mother love story Mughal Dark Secrets taj ott series)


अनाकली हे एक काल्पनिक पात्र आहे की खरं? तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ताजमहालसारखी समाधी आहे. जी अनारकलीची समाधी आहे, असं इतिहासकार म्हणतात. अनेकांना माहिती नाही पण अनारकलीचं खरं नाव नादिरा बेगम असल्याचं इतिहासकार सांगतात. ती इराणहून व्यापार्‍यांच्या ताफ्यासह लाहोरला आली. नादिरा बेगम इतकी सुंदर होती की तिच्या सौंदर्याने प्रत्येक जण घायाळ व्हायचा. नादिराला सम्राट अकबराच्या दरबारात बोलावण्यात आलं. त्यावेळी अनाकली उर्फ नादिराच्या नृत्याने अकबर मोहित झाले. त्यावेळी सम्राट अकबराने नादिराला अनारकली हे नाव दिले. 


अनारकलीबद्दल ज्या सर्व इतिहासकारांनी काही ना काही लिहिलं आहे. त्यापैकी ब्रिटिश पर्यटक विल्यम फिंचचं यांचे शब्द सत्याच्या जवळचं मानलं जातं. 'डॉन' वृत्तपत्रानुसार, फिंचने स्पष्ट सांगितलं आहे की, अनारकली ही अकबरच्या अनेक पत्नींपैकी एक होती. अकबराला अनारकलीपासून दानियाल शाह हा मुलगा होता. मात्र नंतर अनारकली जहांगीरवर प्रेमात पडली आणि सर्व मुघल घराण्यात खळबळ माजली. 


नूर अहमद चिश्ती यांचं 'तहकीकत-ए-चिश्तिया' या पुस्तकतूनही अनारकलीच्या आयुष्यातील अनेक रहस्य उलघडतं. त्या पुस्तकाच्यानुसार अकबर आपला संपूर्ण वेळ अनारकलीच्या कुशीत घालवायचे. हे अकबरच्या तीनही पत्नीला पसंत नव्हतं. त्यामुळे अकबर जेव्हा किल्ला सोडून दख्खनला गेले होते तेव्हा अनारकलीविरुद्ध या तीन राणींनी कट रचला होता.  ती आजारी पडली आणि नंतर तिचा मृत्यू झाला. 


मुघलांकडून अनारकलीचं गायब होणं, जिच्याबद्दल इतिहासाच्या पानांमध्ये भरपूर लिहिलं गेलं आहे. पण काही असो सलीमच्या प्रेयसीपासून ते अकबराची बेगम होण्यापर्यंतच्या सर्व दाव्यांमध्ये एक गोष्ट खूप स्पष्ट आहे. अनारकली ही अफाट सौंदर्याची मापदंड होती.  जिच्या सौंदर्याने मुघल सल्तनत पिता-पुत्र एकमेकांच्या विरोधात उभं केलं.