मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता ईशान खट्टर यांच्या अफेअरची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. दोघे अनेकदा चित्रपट प्रीमियर, पार्टी आणि इतर कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. या दोघींनी एकत्र सुट्टी घालवण्यासाठी परदेशात जात असतात. असं असताना नवीन वर्ष दोघं एकमेकांशिवाय कसं साजरं करतील. त्यामुळे नवीन वर्ष एकत्र साजरे करण्यासाठी ईशान खट्टर आणि अनन्या पांडे सुट्टीवर गेल्याचं समजत आहे. आता याचे पुरावेही मिळाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2021 च्या सुरुवातीला ईशान आणि अनन्या एकत्र सुट्टी घालवताना दिसले. आता आपण सर्व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असताना, ईशान आणि अनन्या पुन्हा एकदा नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी बाहेर गेले आहेत. अनन्या तिच्या जंगल सफारीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. 



दरम्यान, असाच एक फोटो इशान खट्टरनेही शेअर केला आहे. यावरून दोघेही एकत्र असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे अनन्या नव्या वर्षाचं स्वागत ईशानसोबत करत असल्याचं दिसत आहे. 



ऑक्टोबर 2021 मध्ये अनन्या पांडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर आली. त्यानंतर तिला चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आले. त्यावेळी ईशान खट्टर अनन्याला सपोर्ट करताना दिसला. ईशान वांद्र्यात अनन्यासाठी फुले खरेदी करताना आणि तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जाताना दिसला.