मुंबई : बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर खूप वर्षांनंतर 'द जर्नी ऑफ कर्मा' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहेत. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आणि टिझर प्रदर्शित झाले. याप्रसंगी पत्रकारांनी त्यांना श्रद्धाच्या लग्नावरुन छेडले असता ते म्हणाले की, प्रत्येक वडिलांना असे वाटते की, माझ्या मुलीचे लग्न चांगल्या आणि सन्मानित कुटुंबात व्हावे. तिने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातही खूप नाव कमवावे, असा माझा आर्शीवाद आहे. पण एक पिता असल्याण्याच्या नात्याने मी विचार करतो की, तुम्हाला तुमच्या मुलांना स्वातंत्र्य द्यायला हवे. कारण पालकांच्या मनाने लग्न होण्याचा तो जमाना कधीच निघून गेला. त्यामुळे आपली मुले त्यांच्या आवडीनुसार लग्न करु शकतात.


श्रद्धाच्या या गोष्टीवरुन ते आहेत खूश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढे ते म्हणाले की, सध्या श्रद्धा तिच्या करिअरबद्दल अधिक व्यस्त आहे. पण जेव्हा केव्हा ती तिच्या वैवाहिक योजनेबद्दल सांगेल तेव्हा तिच्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करण्यास आमची काही हरकत नसेल. त्याचबरोबर ती तिच्या करिअरमध्ये घेत असलेल्या मेहनतीवर मी अत्यंत खूश आहे, असेही ते म्हणाले.


स्वतःच्या सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल...


स्वतःच्या सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल ते म्हणाले की, माझे सिनेसृष्टीतील प्रवास अतिशय सुंदर होता. माझी मुलेही आयुष्यात चांगले काहीतरी करत आहेत. ही सर्व देवाची कृपा आणि आर्शीवाद आहे.