मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या माता जिजाऊंचा इतिहास दर्शवतेय. त्यामुळे ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरतेय. या मालिकेत विविध व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहेत. यापैकीच एक भूमिका म्हणजे रायबागनची. अभिनेत्री प्रिया मराठे ही भूमिका साकारत होती. प्रियाने या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. घोडेस्वारी, तलवारबाजीपासून इतर गोष्टींसह प्रियाने या भूमिकेतून तिचं अभिनयकौशल्य दाखवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियाने नुकतच या भूमिकेचा निरोप घेतला आहे. सोशल मिडीयावर पोस्ट करून प्रियाने या भूमिकेच्या आठवणी शेअर केल्या आहेत.



 प्रियाने आपल्या पोस्टमध्ये लिहीते की, "एखाद्या व्यक्तिरेखेचा निरोप घेणं हे नेहमी कठीण असतं. कारण प्रत्येक भूमिका हा आपल्या ह्रदयाचा एक हिस्सा त्यासोबत घेऊन जाते. अलविदा रायबागन. तीव्र, प्रखर, एकनिष्ठ आणि साहसी. ऑनस्क्रिन तिला साकारणं आवडलं. धन्यवाद."


या पोस्टमधून प्रियाने सगळ्यांचे आभार मानले आहेत. या ऐतिहासिक हटके भूमिकेतून प्रियाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील औरंगजेबाच्या सैन्याचं नेतृत्व करणारी स्त्री म्हणजे रायबागन. तिचं खरं नाव सावित्रीबाई देशमुख होते. औरंगजेबाने तिला रायबागन हा खिताब बहाल केला होता. हेचं पात्र प्रियाने या मालिकेत साकार लं. या भूमिकेने आता निरोप घेतला असला तरी प्रियाच्या अभिनय कारकिर्दीतील ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील एवढं नक्की.