मुंबई : मुंबई सारख्या विश्वनगरी मध्ये प्रत्येकाचे आपलं स्वत:चं घर असावं अशी इच्छा असते. स्वप्नांच्या या शहरामध्ये प्रत्येक मुलीला आपलं, स्वत:च्या जिद्दीवर एक घर घेण्याचा अट्टाहास असतो. अशीच जिद्द प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टची सुद्धा होती. आलिया तिच्या आई-वडिलांचे घर सोडून आपल्या स्वत:च्या घरात शिफ्ट झाली आहे. आलियाने बॉलिवूडमध्ये अनेक एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत. सध्या तिच्या आणि अभिनेता रणवीर कपूरच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आलियाने तिच्या नवीन घराचा व्हिडिओ देखील यू ट्यूबवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सामान घरात व्यवस्थित लावण्यासाठी तिची बहीण तिला मदत करताना दिसत आहे. तिचा ही व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आलियाने तिच्या आई-वडिलांचे घर सोडले आहे. आई-वडिलांचे घर सोडून राहणे हा सुद्धा एक चांगला अनुभव असल्याचे आलियाने म्हटले आहे.