Archana Puran Singh Shakti Kapoor: अर्चना पूरण सिंहने 1980 मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती. हळू हळू काम करत करत तिला खरी ओळख 90 च्या दशकात मिळाली. अर्चनाने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अनेक बॉलिवूड स्टार्ससोबतही तिला काम करण्याची संधी मिळाली. तिच्या या सहकलाकारांसोबत तिची चांगली मैत्रीही आहे. शक्ती कपूर हे देखील त्यापैकीच एक आहेत. सध्या अर्चना कपिल शर्माच्या नेटफ्लिक्स शो 'द ग्रेट इंडियन कपिल'चा एक भाग आहे. याशिवाय तिने एक यूट्यूब चॅनलही सुरू केले आहे.


यूट्यूब चॅनलवर काय बघायला मिळतं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या  यूट्यूब चॅनलवर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते 'द ग्रेट इंडियन कपिल' शो आणि BTS सीन्सपर्यंतच्या अर्थात कॅमेऱ्याच्या पाठच्या गोष्टी शेअर करते. अलीकडेच तिने तिच्या यूट्यूब व्लॉगमध्ये शोच्या सेटवरील एक घटना शेअर केली आहे. हा व्हिडीओ त्या एपिसोडचा आहे ज्यामध्ये शक्ती कपूर, गोविंदा आणि चंकी पांडे सहभागी झाले होते. यादरम्यान अर्चनाने सांगितले की तिला शक्ती कपूर, यांनी कशी मदत केली होती. 


हे ही वाचा: Golden Globes 2025 च्या रेड कार्पेटवर पोहचली 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट'ची दिग्दर्शक, पायल कपाडियाने लगावला ग्लॅमरचा तडक


 


अर्चनाला घ्यायचे होते स्वतःचे घर 


व्लॉगमध्ये शक्ती कपूरने गंमतीने सांगितले की, अर्चनाने आधीच तीन बंगले खरेदी केले आहेत आणि आता चौथ्यासाठी चर्चा सुरू आहे. यावर अर्चना हसली आणि म्हणाली, "नजर ना लगा तू". शक्तीने उत्तर दिले, "माझी नजर तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही". यानंतर अर्चनाने ती घटना आठवली जेव्हा शक्तीने तिला फ्लॅट घेण्यासाठी 50,000 रुपये उसने देऊ केले होते. ती म्हणाली, "मी ही गोष्ट कधीच विसरू शकत नाही." 


हे ही वाचा: 'या' सुंदरीच्या समोर अनन्या-सुहानाही फेल, वयाच्या 49 व्या वर्षीही 'ती' दिसते अप्रतिम; सौंदर्य टिकवण्यासाठी दुधाने करते अंघोळ?


 


जेव्हा शक्ती कपूरने 50 हजार केले होते ऑफर 


तिने सांगितले, "मी फ्लॅट खरेदी करत असताना शक्तीने मला 50,000 रुपये कर्ज देण्याची ऑफर दिली होती. त्यावेळी ही रक्कम मोठी होती."  एपिसोडमध्ये चंकी पांडेने शक्ती कपूरशी संबंधित एक मजेदार किस्साही शेअर केला आहे.  


 



 


हे ही वाचा: 1 तास 35 मिनिटांचा सस्पेन्स-थ्रिलर, चार हैवानांच्या तावडीत अडकलेली मुलगी; 'या' चित्रपटात प्रत्येक क्षणाला बघायला मिळेल सस्पेन्स


शक्ती कपूरने अभिनेत्याला पाठवले पैसे


90 च्या दशकात जेव्हा शक्तीने खलनायकाच्या भूमिकेत आपले स्थान निर्माण केले होते, तेव्हा त्यांनी एका नवीन अभिनेत्याला 50,000 रुपये पाठवले होते. नव्या अभिनेत्याने खलनायक व्हावे असे त्यांना वाटत नव्हते. शक्तीने अभिनेत्याला सांगितले की ते त्याला हिरो बनवेल, पण त्याने खलनायकाची भूमिका करू नये. चंकीच्या म्हणण्यानुसार, अभिनेता दोन वर्षे घरी बसला होता. यावर शक्तीने उत्तर दिले, "हे खोटे आहे. तो खोटं बोलतोय." शक्ती कपूर यांनी 1975 मध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत त्यांनी 700 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या 'ॲनिमल' चित्रपटात ते शेवटचा दिसला होता.