Neena Gupta : अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या बोल्ड (Bold) भूमिका साकारण्यासाठी ओळखल्या जातात. त्यांनी साकारलेल्या व्यक्तीरेखा चाहत्यांच्या मनात घर करुन गेल्या आहेत. तसेच त्यांना त्यांच्या बोल्ड (Bold Statement) वक्तव्यासाठी देखील ओळखले जाते. नीना गुप्ता यांचं खासगी आयुष्यही त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच चर्चेचा विषय राहिलं आहे. अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच आपली मतं मांडतात. विशेषतः माहिलांशी संबंधित विषयांवर. अलीकडेच, अभिनेत्रीने लग्न आणि घटस्फोटाशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या, ज्यानंतर त्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हल्ली घटस्फोटाची (divorce) प्रकरणे कशी वाढत आहेत हे अभिनेत्रीने सांगितले. (Why are there so many divorces all of a sudden single mother neena gupta told the real reason nz)



जाणून घ्या काय म्हणाल्या नीना गुप्ता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीना गुप्ता यांना अनेकदा त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात. असाच काहीसा प्रकार नुकताच घडला. त्यांनी अलीकडेच त्यांच्या वध या चित्रपटासाठी माध्यामांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी मुलाखतीत मसाबा गुप्ताच्या घटस्फोटावर भाष्य केले.


मसाबाच्या घटस्फोटाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, लोकांना घटस्फोटाचा निर्णय मूर्खपणाचा वाटतो पण आजच्या काळात ते आवश्यकही आहे.


आज तरुण मुली आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत आणि त्या पुरुषांवर अवलंबून नाहीत. यामुळे, ती घटस्फोट घेण्यास सक्षम आहे. नीना गुप्ता म्हणाल्या की, पूर्वीच्या काळात महिलांना शांतपणे त्रास सहन करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नव्हता. या गोष्टींचा अर्थ असा नाही की नीना गुप्ता लग्नाला चुकीचे मानतात कारण त्यांनी मुलाखतीदरम्यान लग्नाला एक चांगली संस्था असल्याचे सांगितले.



घटस्फोट घेणे सोपे नाही


"लग्नानंतर घटस्फोटाचा निर्णय घेणे कोणत्याही महिलेसाठी सोपे नसते. विशेषत: जेव्हा तिला मुले असतात, कारण या निर्णयामुळे तिच्या मुलांच्या आयुष्यावरही परिणाम होतो. त्यामुळेच अनेक महिला घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत नाहीत.


'तुम्ही सक्षम असल्यास, तुम्ही सहजपणे घटस्फोट घेऊ शकता'


घटस्फोटाचा निर्णय घेणे मला अवघड जाणार नाही कारण मी स्वतःला माझ्या मुलांचे पालनपोषण करण्यास सक्षम आहे. त्यामुळेच स्वावलंबी होणे गरजेचे आहे.