Shah Rukh Khan : बॉलिवूडचा रोमान्स किंग शाहरुख खानने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, त्याच्या कारकिर्दीत अशी एक वेळ आली की त्याचा चित्रपट फ्लॉप झाला. 2018 मध्ये रिलीज झालेला शाहरुख खानचा 'झिरो' हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ देखील होत्या. हा चित्रपट प्रदर्शित झाला पण चित्रपट खूप चालला नाही. यानंतर शाहरुख खानने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झिरो' फ्लॉप झाल्यामुळे ब्रेक घेतला?  


एका मुलाखतीत शाहरुख खानने सांगितले की, त्याने चित्रपटांमुळे ब्रेक घेतला नव्हता. आपल्या कामाच्या पद्धतीबद्दल तो म्हणाला की, ज्या दिवशी सकाळी मी लवकर उठत नाही त्या दिवशी मला काम करु वाटत नाही. चित्रपटाच्या अपयशामुळे मी ब्रेक घेतला नाही. असे तो म्हणाला. 


पुढे शाहरुख म्हणाला की, एक दिवशी तो उठला आणि त्याने आपल्या चित्रपटाच्या निर्मात्यांना फोन केला आणि सांगितले की, तो एक वर्षे काम करणार नाही. कारण तो जानेवारीत एक चित्रपट करत होता आणि त्याने डिसेंबरमध्ये फोन केला होता. 



काय होते कारण?


शाहरुख खान म्हणाला की निर्मात्याचा यावर विश्वास बसला नाही. कारण तो वर्षभर काम केल्याशिवाय बसला नव्हता. निर्मात्याने त्याला सांगितले की, जर त्याला चित्रपट आवडला नाही तर तो सहज नकार देऊ शकतो. तुम्ही ब्रेक घेत आहात असे म्हणू नका. 


त्यानंतर दीड वर्ष उलटून गेल्यावर चित्रपट निर्मात्यांनी शाहरुख खानला फोन करून म्हणाले की तू (शाहरुख) प्रत्यक्षात काम करत नसल्याचे आश्चर्य वाटल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर शाहरुख खान म्हणाला की, मला फक्त काम आणि अभिनय करायचा नव्हता. अभिनय माझ्यासाठी खूप ऑर्गेनिक आहे. म्हणूनच मी ब्रेक घेतला.