मुंबई : जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांची नावं सिनेसृष्टीतील सर्वोत्तम जोडप्यांमध्ये आहेत. ते दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा ते रील व्हिडिओ शेअर करून लोकांचं मनोरंजन करत असतात. दरम्यान, जेनेलियाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती रितेशशी लग्न का केलं आहे. याबद्दल सांगत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओ खूप मजेदार आहे
जेनेलियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत रितेश देशमुखही दिसत आहे. रितेश तिला विचारतो, "तु माझ्यात असं काय पाहिलंस ज्यामुळे तू माझ्याशी लग्न करण्यास तयार झालीस?" रितेशच्या या प्रश्नाचं उत्तर जेनेलिया अतिशय मजेशीरपणे देते. आणि म्हणते, "मी एकदा तुला माझ्या बाल्कनीतून कपडे धुताना आणि भांडी घासताना पाहिलं होतं."


जेनेलियाचं हे उत्तर ऐकून रितेशने धक्कादायक प्रतिक्रिया दिली, तर त्याची प्रतिक्रिया पाहून जेनेलिया खूपच खूश दिसत आहे. या व्हिडिओला जेनेलियाने एक मजेदार कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये जेनेलियाने लिहिलं आहे की, ''लव एट फर्स्ट वाश''


अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या
जेनेलियाने शेअर केलेला हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे. त्याचबरोबर यावर लोकांच्या मजेदार प्रतिक्रियाही समोर येत आहेत. या व्हिडिओमध्ये यूजर्स 'लाफ्टर' इमोजीसह प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर रितेशला सल्ला देताना एका यूजरने लिहिलं की, "रितेश बाबा, त्याच्यावरही केस बनवली आहे." रितेश आजकाल Amazon Mini TV वर 'केस तो बनता है' नावाचा शो होस्ट करत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या शोमध्ये बॉलिवूड स्टार्स सहभागी होतात आणि त्यांच्यावर अनेक आरोप केले जातात. हा कोर्टरूम कॉमेडी शो आहे. मात्र, रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा अनेकदा सोशल मीडियावर अशा फनी रील बनवण्यासाठी ओळखले जातात.