मुंबई : लॉक अप शोचा आज 7 मे रोजी आणि उद्या 8 मे रोजी फिनाले आहे. त्यामुळे या शोचा कोण विजेता ठरतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता मुनव्वर फारूकी आणि अंजलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोघेही ब्रेकअप सॉंगवर डान्स करताना दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ नेमका का व्हायरल होत आहे ? तसेच मुनव्वर फारूकी आणि अंजलीने ब्रेकअप सॉंगवर डान्स का केला असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भातले उत्तर या बातमीत पाहूयात.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉक अप शोच्या अंतिम भागात एकापेक्षा एक मजेदार डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. या संबंधित टीझर ही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.  या टीझरमध्ये फाईनलीस्ट मुनव्वर फारूकी आणि अंजली अरोरा सोबत स्टेज परफॉर्मन्स देणार आहेत. यामध्ये ते दोघे ''ए दिल है मुश्किल'' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हाच व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. 


दरम्यान लॉक अपच्या फिनालेत, शिवम शर्मा, प्रिंस नरूला, आजमा फल्लाह, मुनव्वर फारूकी, पायल रोहातगी आणि अंजली अरोरा यांच्यामध्ये फिनालेची लढत होणार आहे. या शोचा विजेता अभिनेत्री कंगणा रणौत जाहीर करणार आहे. दरम्यान विजेत्या जाहीर होण्याआधीच सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी मुन्नवर-फारूकीलाच विजेता घोषित केले आहे. मुन्नवर फारूकचीच ट्ऱॉफी असेल ट्विटरवर ट्रेंड होत आहे.   


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्याना लॉक अपचा फिनाले जिंकणाऱ्याला 25  लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे.  तर या शोमध्ये प्रिंस नरूला आणि मुनव्वर फारूकी चाहत्यांचे फेवरेट कंटेस्टंट बनले आहेत. आता या लॉक अपचा फिनालेचा विजेता कोण ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.