मुंबई : अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan)ने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. साराचा स्वभाव आणि अभिनय चाहत्यांना फार आवडतो. सोशल मीडियावर सारा तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. खऱ्या आयुष्यातही सारा फार चंचल आहे. एकदा तिनं असं काम केलं, की लोक तिला भिकारी समजून पैसे देऊ लागले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा अली खानने सांगितले की, एकदा ती तिचे वडील सैफ, आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिमसोबत फिरायला गेली होती. यावेळी तिचे आई-वडिल काही खरेदी करण्यासाठी दुकानात गेले. तेव्हा सारा, इब्राहिम आणि हाऊस हेल्पर त्या दुकानाबाहेर उभे होतो. 'तेव्हा मला काय झालं मला माहिती नाही. मी त्याठिकाणी नाचू लागले.'



पुढे सारा म्हणाली, 'लोक तिथे थांबले आणि मला पैसे देऊ लागले, कारण त्यांना वाटले की मी पैसे मागत आहे. मी पैसे ठेवले, मला कळले की मला पैसे मिळत आहेत, काहीही करा, करत रहा, मी पुन्हा नाचली. त्यानंतर हेल्परने आई-वडिलांना सांगितलं. सारा लोकांनी इतकी आवडली त्यांनी तिला पैसे दिले.'


साराच्या या कृत्यावर तिची आई अमृता म्हणाली, 'सारा क्यूट नाही, खट्याळ मुलगी दिसत आहे.' सारा अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी आहे. सैफ आणि अमृता यांचं लग्न 1991 साली झालं. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. 2004 साली सैफ आणि अमृता विभक्त झाले.