मुंबई : बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे फार कमी वेळात नाव कमावतात. 'रॉकस्टार' चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या नर्गिस फाखरीसोबतही असंच काहीसं घडलं आहे. नर्गिसने "मैं तेरा हीरो" या चित्रपटातही तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. यासोबतच तिचे अनेक आयटम साँन्गही हिट ठरले आहेत. पण तिच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला ज्यामुळे ती बॉलिवूड सोडून न्यूयॉर्कला गेली. पण आता ती मुंबईत परतली आहे. खुद्द अभिनेत्रीने बॉलिवूड सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नर्गिसने सांगितलं होतं की, 'कुठेतरी मला असं वाटत होतं की, माझ्यावर कामाचा दबाव वाढत आहे. त्यामुळे मी खूप तणावात होते. मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही मिस करत होते. मला आठवतं की, 2016 आणि 2017 मध्ये मला याची जाणीव झाली.


या कामातून मला आनंद मिळत नसल्याची जाणीव झाली. मी बॅक टू बॅक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यादरम्यान बरंच काही घडत होतं. मला ते थांबवायचंही होतं. माझं मन आणि शरीर यांचा समतोल राखण्यासाठी मला ते थांबवावं लागेल हे मला जाणवलं आणि म्हणूनच मी हे पाऊल उचललं.


याशिवाय अभिनेत्रीने सांगितलं की, 'कधीकधी एकटं राहणं कठीण असतं. माणूस म्हणून तुम्हाला सपोर्ट सिस्टमची गरज असते. म्हणून मी न्यूयॉर्कला परत गेले. मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबियांना खूप दिवसांपासून भेटले नव्हते. म्हणून जेव्हा मी परत गेले तेव्हा मी त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला. आता मी पूर्णपणे निरोगी आहे'. एखाद्या अभिनेत्रीसाठी असे खुलासे करणं सोपं नसतं. त्यामुळे या संवादाशी संबंधित लोकांच्या मनाची स्थितीही समजू शकेल. अशी आशाही मला वाटते.