Dimple Kapadia-Rajesh Khanna : बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी डिंपल कपाडिया आणि अभिनेता राजेश खन्ना यांच्या नात्याबद्दल अनेक बातम्या समोर येत असतात. बॉबी चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या डिंपलने 16 वर्षांच्या असताना राजेश खन्नाशी लग्न केलं. लग्नानंतर चित्रपटापासून दूर झालेली डिंपलला एकापाठोपाठ दोन मुली झाल्यात. राजेश खन्नाशी लग्न केल्यानंतर डिंपलला समजलं हे नातं फार काळ टिकू शकतं नाही. (Why Dimple Kapadia didnt divorce Rajesh Khanna after years of separation)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाच्या 9 वर्षांनी डिंपल यांनी घर सोडलं आणि दोन मुलींना घेऊन त्या माहेरी गेल्या. बॉलिवूडमध्ये असे अनेक नाती आहेत. जी लग्नानंतर तुटली पण त्या जोडप्याने घटस्फोट घेऊन नव्याने आयुष्य सुरु केले. पण डिंपल या राजेश खन्नापासून अनेक वर्ष वेगळ्या राहिल्यात. पण डिंपल यांनी राजेश खन्ना यांना कधीही घटस्फोट दिला नाही. अगदी राजेश खन्नाच्या शेवटच्या क्षणी आणि राजेश यांनी जगाला निरोप दिला तेव्हाही डिंपल तिथे होत्या. 


त्यामुळे चाहत्यांना राजेश खन्ना आणि डिंपल यांच्या नात्याबद्दल काय प्रश्न पडतो. जर नात्यामध्ये तणाव होता, डिंपल घर सोडून गेल्यात, अनेक वर्ष वेगळ्या राहिल्यात अगदी डिंपल यांना दुसरं लग्न करायच होतं. त्यांनी एका मुलाखती मला मुक्तपणे जगायला आवडतं पण दुसऱ्या लग्नावर त्या विचार करतील. 


...म्हणून डिंपलने राजेश खन्नाला घटस्फोट दिला नाहीं!


सोशल मीडियावर एक व्हिडीओ गेल्या काही महिन्यांपासून व्हायरल होतोय. ज्यामध्ये राजेश खन्ना डिंपलने त्यांना घटस्फोट का दिला नाही, याबद्दल सांगितलंय. हा व्हिडीओ अतिशय जुना असून एका मुलाखातीचा आहे. 


ज्यात पत्रकाराने विचारलं की, 'तुम्ही आणि डिंपल पुन्हा एकत्र येणार आहात का?' त्यावर राजेश खन्ना म्हणालेत, 'पुन्हा काय आम्ही वेगळे कधी झालो. आम्ही फक्त वेगळे राहतो. कारण डिंपलने मला घटस्फोट दिला नाही. ती घटस्फोट देत नाहीय. ती घटस्फोट का देत नाही याच कारण माहिती नाही. पण तिलाही या मुलाखती बोलवा आणि विचारा ती घटस्फोट का देत नाही. ते योग्य उत्तर देईल.'



1982 मध्ये डिंपल तिच्या दोन मुलींसह पतीपासून विभक्त झाली. होय, दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते पण तरी त्यांनी कधीही अधिकृत घटस्फोट घेतला नाही.