मुंबई : सध्या मनोरंजन क्षेत्रात ऐश्वर्या बच्चनच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा आहे. अनेकजण ही बातमी खरी असल्याचं म्हणतायेत तर अनेकांनी मात्र या बातमीला अफवा असल्याचं म्हटलं आहे. अद्यापतरी बॉलिवूडच्या या जोडीने यावर मौन बाळगलंय. सध्या चाहते या दोघांच्या वक्तव्याची वाट पाहत आहेत. मात्र या सगळ्या दरम्यान नुकताच बीग बी यांनी  त्यांची लेक श्वेता बच्चनला त्यांचं पहिलं घर म्हणजेच प्रतीक्षा बंगला भेट केला आहे. रिपोर्ट्सनुसार, हे देखील समोर आलं आहे की एकूण 16,840 स्क्वेअर फूट मोठा असा हा बंगला आहे. या बंगल्याची किंमत ही 50.63 कोटी आहे. इकोनॉमिक टाइम्स' नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, 8 नोव्हेंबर 2023 ला अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी साइन केली होती आणि त्यांनी स्टॅम्प ड्युटीसाठी तब्बल 50.65 लाख रुपये खर्च केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण या सगळ्या बातम्यांदरम्यान अजून एक चर्चा आहे ती म्हणजे श्वेता बच्चनचा घटस्फोट. एकीकडे ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना मात्र श्वेताचाही घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. आणि तिच्या चर्चेच कारण म्हणजे ती मुंबईत राहते. श्वेता सासरी दिल्लीत राहत नाही. श्वेताचा पती बिझनेसमन आहे. त्यामुळे तो दिल्लीत राहतो. सुरुवातीच्या काळात तिची मुलं लहान असल्या कारण्याने तिला तिच्या करिअवर फोकस करता आलं नाही. पण आता तिच्या आवडत्या क्षेत्रात ती काम करतेय. श्वेता सासरी राहत नाही, यामागचं कारण तिचं करिअर आहे असं बोललं जातं


काही काळापूर्वी अशा अफवा होत्या की श्वेता व निखिल बऱ्याच वर्षांपासून वेगळे झाले आहेत, पण त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. पण निखिल व श्वेता यांचा घटस्फोट झालेला नाही. श्वेता फॅशन डिझायनर व लेखिका आहे. श्वेता व निखिल यांचे प्रोफेशन खूप वेगळे आहेत. त्यामुळे ती मुंबईत राहते व तिचे पती दिल्लीत राहतात. एकीकडे ऐश्वर्या अभिषेकच्या घटस्फोटाची बातमी ऐकून चाहते हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे श्वेताच्याही घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता बच्चन कुटूंब या सगळ्यावर काय प्रतिक्रीया देतंय याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


1 नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याने तिचा 50 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्तानं जगभरातून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्तानं अभिषेकनं सोशल मीडियावर तिचा एक मोनोक्रॉम फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. अभिषेकनं शेअर केलेल्या फोटोत तो नव्हता आणि त्या फोटोमुळे देखील त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.