Oviya Video Leaked: बिग बॉस तामिळ सीझन 1 ची स्पर्धेक ओविया (Oviya) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ओवियाला हेलन नेल्सन (Helen Nelson) नावानेही ओळखलं जातं. ओविया सध्या चर्चेत असण्याचं कारण म्हणजे, सोशल मीडियावर तिचा एक खासगी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती एका व्यक्तीसह आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहे. पण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खरा आहे की खोटा याबाबत चर्चा सुरु आहे. काहीजण हा डीपफेक असण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. तर काहींनी व्हिडीओशी छेडछाड करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली आहे. पण काहींनी मात्र हातावरील टॅटूकडे लक्ष वेधत ही तीच असल्याचा दावाही केली आहे. यादरम्यान ओवियाने यावर कोणतंही अधिकृत भाष्य केलेलं नाही. मात्र व्हिडीओमुळे होत असलेल्या टीका, छळ यावर व्यक्त झाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओवियाने या वादावर थेट भाष्य केलेलं नाही, मात्र इंस्टाग्रामला आपला एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने फिंगर क्रॉस ठेवले आहेत. ओवियाने फोटो पोस्ट करताच त्यावर युजर्सनी कमेंट्स करण्यास सुरुवात केली. यामध्ये एकाने तिला व्हायरल व्हिडीओवर भाष्य करण्याचं आवाहन केलं. त्यावर तिने 'Next time, bro' म्हणजेच पुढच्या वेळी असं उत्तर दिलं. 


एफआयआर दाखल


ओवियाने याप्रकरणी चेन्नई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. जेव्हा प्रसारमाध्यमांनी तिच्या मॅनेजरशी संपर्क साधला तेव्हा त्याने सांगितलं की , "हा छेडछाड करण्यात आलेला व्हिडीओ आहे. एखाद्याने ओवियाची बदनामी करण्याच्या हेतूने हा व्हिडीओ बनवला. तिने पोलीस आयुक्तांकडे हे प्रकरण नेलं असून, दोषींविरोधात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे".


ओविया कोण आहे?


ओविया ही एक तमिळ आणि मल्याळम अभिनेत्री आहे, जिने 2007 मध्ये कांगारू चित्रपटाद्वारे पदार्पण केले. तथापि, दिग्दर्शक सरकुनमचा ग्रामीण रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'कलावणी'ने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. तमिळ इंडस्ट्रीमध्ये ओवियाचाही हा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर, तिने मनमदन अंबू, किराटका, मरीना, मूडर कूडम, मिस्टर मोम्मागा यांसारख्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केले. वर्षानुवर्षे, ओवियाने तेलुगू आणि कन्नड चित्रपटसृष्टतही स्थान निर्माण केले.


चित्रपटांव्यतिरिक्त, तिने अनेक रिॲलिटी टीव्ही शोमध्येही भाग घेतला. बिग बॉस (तामिळ) सीझन 1 मधून तिला फार प्रसिद्दी मिळाली. यामुळे तिचं नाव घराघरात पोहोचलं. बिनधास्त स्वभाव आणि निरर्थक वृत्ती यामुळे ती लोकप्रिय झाली. तिच्या भावना व्यक्त करण्यात आणि कॅमेऱ्यासमोर आहे तशी राहण्यात ती मागे पडली नाही. 


तथापि, जेव्हा ती सहकारी स्पर्धक आरवच्या प्रेमात पडली तेव्हा मात्र तिला महाग पडलं. त्याने तिच्या भावनांना प्रतिसाद दिला नाही. आरवसोबत झालेल्या वादानंतर तब्येतीच्या समस्येमुळे ओवियाला मध्येच शो सोडावा लागला होता. तिने स्विमिंग पूलमध्ये उडी मारून स्वत:ला दुखावण्याचाही प्रयत्न केला. तिने निर्मात्यांना विनंती केली की त्यांनी परिस्थितीचा विचार करावा आणि तिच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिला घर सोडू द्यावं.