मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खानच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच पसरत आहेत. बॉलिवूडच्या या जोडीला चाहते सुद्धा दमदार पसंती देत आहेत. हे दोघे एकमेकांसोबत चित्रपट तर साकारत आहेतच पण एकमेंकाना वेळ द्यायला सुद्धा विसरत नाहीत. सध्या हे दोघे त्यांच्या नात्याला नवीन वळण देण्याच्या मर्गावर आहेत. एवढचं नाही तर कार्तिकने त्याची सुरूवात सुद्धा केली. सारा आणि कार्तिक त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिक सारा सोबतच तिच्या घरच्यांसह सुद्धा जवळीक निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. तो साराची आई अमृता सिंग सोबत फोनवर बोलत असतो. ज्याप्रकारे सारा नियमितपणे तिच्या आईसोबत संवाद साधते त्याच प्रमाणे कार्तिक सुद्धा कार्तिक सुद्धा साराच्या आईसह संवाद साधतो. त्याचप्रमाणे तिचा भाऊ इब्राहिम सोबत मैत्री वाढवण्याच्या प्रयत्नात कार्तिक आहे. 


इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव आज कल २' चित्रपटात सारा-कार्तिक एकत्र झळकणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण सध्या लखनौयेथे होत आहे. शूटींगदरम्यानही कार्तिक साराच्या आजुबाजूलाच असतो. तर कधी चाहत्यांच्या घोळक्यात तिचं संरक्षण करताना दिसतो. परंतू दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. 


दिल्लीमध्ये पहिल्यांदाच साराने फॉशन शोमध्ये रॅम्प वॉक केले. यावेळेस साराचा उत्साह वाढवण्यासाठी चक्क कार्तिक याठिकाणी उपस्थित होता. कार्तिक आणि सारा त्यांच्या आगामी 'लव आज कल २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाशिवाय सारा 'कुली नंबर १' चित्रपटातून वरुण धवनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.