मुंबई : हॉलिवूड पॉप सिंगर जस्टिन बीबर आपल्या गाण्यामुळे करोडो प्रेक्षकांच्या मनावपर राज्य करतो. नुकताच त्याने कोचेला येथे त्याच्या परफॉर्मेन्सने त्याच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. यानंतर त्याने त्याच्या सोशल मीडियानर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनेक सेल्फी आहेत, जे काळजीपूर्वक पाहिल्यावर त्याच्या डोळ्यात अश्रू असल्याचं दिसून येतंय. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहते विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. त्याच्या या पोस्टवर पत्नी हेलीनेही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, प्रसिद्ध गायकाच्या ताज्या पोस्टमुळे चाहत्यांची अस्वस्थता वाढत आहे. चाहत्यांना आता गायकाची काळजी वाटू लागली आहे. प्रत्येकाला त्याच्या मानसिक आरोग्याची काळजी असते. गायकाने त्याच्या अकाऊंटवरून स्वतःचे दोन रडणारे फोटो शेअर केले आहेत. ज्यानंतर चाहते चिंतेत दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याची अशी अवस्था पाहून त्याचे चाहते काळजीत पडले आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये त्याला याबाबत प्रश्न विचारत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, "रडू नकोस, नाहीतर मी पण रडेन." तर अजून एका चाहत्याने चिंता व्यक्त करत लिहिलंय की, "जस्टिन तू ठीक आहेस?" मीडिया रिपोर्ट्सनुसार, जस्टिन आणि हेलीचं नातं गेल्या काही वर्षांत खूप चढ-उतारांमधून गेलं आहे. वयाच्या 12 व्या वर्षी हेलीची जस्टिनशी भेट झाली. 2015 मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. यानंतर ते 2016 मध्ये थोड्या काळासाठी वेगळे झाले, पण काहीच दिवसांत दोघांमधील हे प्रकरण मिटलं. काही वर्षांनी दोघांचं लग्न झालं.



जस्टिन ऑक्टोबर 2022 मध्ये भारतात कार्यक्रम करणार होता, मात्र तब्येतीच्या समस्येमुळे त्याचा कॉन्सर्ट रद्द करावा लागला. हा त्याचा भारतातील दुसरा कार्यक्रम होता. याआधी त्याने 2017 मध्ये मुंबईत परफॉर्म केलं होतं. बीबरच्या तब्येतीबद्दल सांगायचं झालं तर, या वर्षाच्या सुरुवातीला त्याला रामसे हंट सिंड्रोमचे निदान झालं होतं. यानंतर त्याने स्टेज परफॉर्मन्सपासून स्वतःला दूर केलं.


आजकाल, सोशल मीडिया हे सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये एक माध्यम बनले आहे जिथे ते त्यांच्या मनातील भावना एकमेकांशी शेअर करू शकतात. अशा परिस्थितीत चाहतेही त्यांच्या आवडत्या स्टार्सचे सोशल मीडिया अकाउंट तपासत असतात. जे पाहून त्याचे चाहते प्रचंड नाराज आहेत.