मुंबई : ऍक्शन स्टार अक्षय कुमार स्टारर आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित मोस्ट अवेटेड चित्रपट 'सूर्यवंशी' रिलीज झाला आहे. रिलीज होताच देशभरात या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. मात्र दरम्यान या चित्रपटाला पंजाबमध्ये विरोध होत आहे. भारतीय शेतकरी आंदोलनाचा परिणाम अक्षय कुमारच्या चित्रपटावर स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे चित्रपटगृहात चित्रपटाचे शो बंद करण्यात आले आहेत. याचा फटका निर्मात्यांना बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमागृह मालकांनी घेतला मोठा निर्णय
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या भारतीय शेतकरी आंदोलनामुळे आता संपूर्ण पंजाबमध्ये अक्षय कुमारला विरोध होत आहे. बॉलीवूडलाइफ डॉट कॉमच्या म्हणण्यानुसार, या विरोधामुळे, थिएटर मालकांना आता भीती आहे की 'सूर्यवंशी'चे शो चालवले तर त्यांच्या थिएटरवर हल्ला होऊ शकतो. कारण शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या संघटनांनी 'सूर्यवंशी' चित्रपटगृहात चालवू न देण्याचा इशारा दिला होता, त्यानंतर चित्रपटगृह मालकांनी 'सूर्यवंशी' चित्रपट पडद्यावर न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.


सोशल मीडियावर गोंधळ
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर किसान एकता मोर्चाच्या फेसबुक पेजवर या संदर्भातील एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये लोकांना 'सूर्यवंशी' चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा सल्ला दिला आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'ते येतात, लुटतात आणि विसरतात. पंजाबमध्ये 'सूर्यवंशी' चित्रपटाला विरोध आहे. 


'सूर्यवंशी'ची चांगली कमाई
अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये पूर्णपणे वेगळे वातावरण पाहायला मिळाले. पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी आणि उत्साह होता. इतकेच नाही तर 'सूर्यवंशी'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 26.29 कोटींची कमाई करत देशभरातील सिनेसृष्टीत धुमाकूळ घातला आहे.