मुंबई : अफगाणीस्तानमध्ये तालिबानची सत्ता स्थापन झाल्यापासून सर्वत्र तालिबानच्या क्रुरतेची चर्चा आहे. दरम्यान तालिबानच्या सत्तेनंतर भारतीय मुस्लिमांचे काही वक्तव्य समोर आले, ज्यावर बॉलिवूडचे अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी टिप्पणी केली, जी  तुफान व्हायरल झाली. ते म्हणाले होते की 'फिल्म इंडस्ट्रीला सरकारकडून त्यांच्या विचारांचं समर्थन करणारे चित्रपट बनवण्यासाठी प्रोस्ताहित केलं जातं. अशा चित्रपटांनी क्लिन चिट  देण्याचा दावा देखील करण्यात येतो.' काही दिवसांपूर्वीच नसीरुद्दीन शाह यांनी तालिबानचं समर्थन करणाऱ्या भारतीयांवर निशाणा साधला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह म्हणाले, सेलिब्रिटींना महत्त्वांच्या विषयांवर बोलण्यासाठी दबाव टाकण्यात येतो. बॉलिवूडच्या तीन खान यांना तर होणाऱ्या टीकेची चिंता आहे. त्याला कारण देखील तसं आहे. त्यांच्याकडे गमावण्यासाठी बरतचं काही आहे. त्यामुळे त्यांचं केवळ आर्थिक नुकसान होणार नसून अन्य अडचणी देखील त्यांच्या मार्गावर येतील...'


यावेळी  त्यांनी चित्रपटांबद्दल देखील स्वतःची भूमिका मांडली ' सरकारकडून त्यांच्या विचारांचं समर्थन करणारे आणि नेत्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करणारे चित्रपट  बनवण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहित केले जाते. यासाठी त्यांना आर्थिक मदतही दिली जाते. यासह, जर त्यांनी प्रचार करणारे चित्रपट बनवले तर क्लीन चिटचे आश्वासन दिले जाते.' 


शाह यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते गेल्या 5 दशकांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. त्यांनी 'निशांत', 'आक्रोश', 'मिर्च मसाला', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'जुनून', 'मंडी', 'अर्ध सत्य', 'जाने भी दो' अशा एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अनेक चित्रपटांसाठी त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे.