Motherhood : ज्येष्ठ पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्या नात्याचा पायाच जणू त्यांचा एकमेकांवर असणारा विश्वास होता. अख्तर आणि आझमी फक्त पती- पत्नी, याच नात्यात एकत्र आले नाहीत. तर, ते एकमेकांचे तितकेच चांगले मित्रही आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या लग्नातून विभक्त झाल्यानंतर जावेद अख्तर (javed Akhtar) यांनी शबाना यांच्याकडे प्रेमाची कबुली दिली आणि त्यांच्यासह वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली. शबाना आणि जावेद अख्तर यांच्या लग्नाला आज कित्येक वर्षे उलटून गेली. पण, आजही या जोडीला स्वत:चं मूल नाही. (why javed Akhtar Shabana Azmi doesnt have child read heartbreaking story)


पैसा, प्रसिद्धी... गडगंज श्रीमंती, विद्वत्ता सर्वकाही असतानाही आझमी यांना कधीच मातृसुख मिळालं नाही. एका मुलाखतीत खुद्द या ज्येष्ठ अभिनेत्रीनंच आपल्याला काही वैद्यकिय कारणांमुळं मूल नसल्याचं कारण पहिल्यांदाच सर्वांसमोर आणलं होतं. 


आपल्याला मातृत्त्वं का मिळणार नाही, हे कारण जेव्हा समोर आलं तेव्हा मनात कालवाकालव झाली, पोटात खड्डा पडला. पण, आयुष्याच्या या प्रवासाच सर्वांनाच सर्वकाही मिळत नाही, असं म्हणत त्यांनी कशीबशी स्वत:चीच समजुत काढली. यादरम्यान त्यांना जावेद अख्तर यांची साथ मिळाली. 


वाचा : Raju Srivastava यांच्या प्रकृतीबद्दल मोठी Update, गेल्या तीन दिवसांपासून... 


 


जावेद यांच्या पहिल्या पत्नीपासूनची मुलं, (Farhan Akhtar Zoya Akhtar) झोया आणि फरहानही शबाना (Shabana Azmi) यांच्या संपर्कात राहिले ज्यामुळं त्यांना कधीच स्वत:चं मूल नसल्याची उणीव भासली नाही. शबाना आपली इतकी चांगली मैत्रीण आहे, की लग्नही त्यावर परिणाम करु शकली नाही, असं जावेद अख्तर वारंवार म्हणत असतात. त्यांची हीच मैत्री नात्यातील आव्हानात्मक काळात मोठा आधार देणारी ठरली असं म्हणायला हरकत नाही.