Koffee With Karan : चाहत्यांना सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल (Personal lives of celebrities) जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते. फार कमी कलाकार त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलतात. पण दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) 'Koffee with karan' च्या शोमध्ये सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगते. 'कॉफी विथ करण 7'मध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये सेलिब्रिटींच्या सेक्स लाईफबद्दल बोलल्यामुळे करण जोहरवर टीका झाली होती. करणने नुकताच सीझन पूर्ण केला. आता शोबद्दल मिळालेल्या फीडबॅकवर करणने आपली प्रतिक्रिया दिली आहे. (koffee with karan on hotstar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होणाऱ्या टीकेवर करणचं उत्तर 
करण जोहरने शोमध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींना त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. यंदाचा करणचा शो देखील तुफान गाजला. ज्यामुळे तो प्रचंड आनंदी होता. 'काही लोकांमुळे मला शोमध्ये बदल करायचे नाहीत...' असं देखील अखेरीस म्हणाला. 


एका मुलाखतीत करणने शोबद्दल स्वतःचं मत मांडलं. 'मला ज्या गोष्टी आवडतात त्याच मला करायला आवडतात. कॉफी विथ करण केल्याने मला आनंद होते. शो केल्यानंतर मला अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी मला विचारलं “करण आलियाबद्दल इतकं का बोलतो? तो लोकांच्या लैंगिक जीवनाबद्दल इतकं का बोलतो? (karan johar interview)


या सर्व प्रश्नांचं उत्तर देताना करण म्हणाला, 'कदाचित मला लोकांच्या लैंगिक जीवनाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे म्हणून मी त्यांना विचारले. तर आलियाचा मला अभिमान आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी बोलताना मी आलियाच्या नावाचा उल्लेख करतो.' (Karan Johar with Alia bhatt)


पुढे करण म्हणाला, 'Koffee with karan फक्त एक टॉक शो आहे आणि लोक याबद्दल मोठं विश्लेषण करतात. मला आनंद आहे की त्यांच्याकडे शोचं विश्लेषण करण्यासाठी इतका वेळ आहे. मी त्यावर इतका वेळ घालवणार नाही. ते असे का करतात हे मला माहीत नाही.' असं देखील करण म्हणाला. (koffee with karan season 7)