Kareena Kapoor Khan Zero Figure : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या क्रु या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा आगामी चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच 29 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. करीनाला या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. करीनानं तिच्या करिअरच्या 24 वर्षांत आजपर्यंत अनेक हिट चित्रपट दिली. मात्र, एक चित्रपट तुमच्या लक्षात आहे ज्यामुळे करीनाचं संपूर्ण आयुष्य बदललं. तो चित्रपट म्हणजे 'टशन'... तिच्या चित्रपटापेक्षा तिची झीरो फिगर ही त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'टशन' या चित्रपटातील करीनाच्या अभिनयापेक्षा तिच्या झीरो फिगरची सगळ्यात जास्त चर्चा सुरु होती. तिच्या या चित्रपटाविषयी आणि झीरो फिगरविषयी करीनानं रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये वक्तव्य केलं आहे. तिला यावेळी विचारण्यात आलं की इतकं वजन कमी केल्यानं आरोग्यावर काही वाईट परिणाम नव्हता का? त्यावर उत्तर देत "तू मला ओळखलंस, मी महत्त्वाकांक्षी आहे पण इतकी नाही की स्वत: च्या मानसिक आरोग्याला त्रास होईल असं काही करेन. झीरो साइज करण्यासाठी मला जवळपास दीड वर्षांचा काळ लागला आणि हे एक चॅलेन्ज होतं." 



करीनानं पुढे अॅक्शन करण्याची इच्छा व्यक्त करत सांगितलं की "मला आयुष्यात एकदा अॅक्शन चित्रपट करायचा आहे, कारण टशननंतर मी एकही अॅक्शन चित्रपट केला नाही. पुन्हा अॅक्शन चित्रपट करण्यासाठी वजन कमी करण्याविषयी विचारलं तर करीना म्हणाली, आता आपण अशा एका जनरेशनमध्ये राहत आहोत, जिथे सगळं काही मान्य करण्यात येतं आणि मला नाही वाटतं ती अॅक्शन चित्रपटासाठी मी अशा बॉडीची स्वीकार करेन. मला वाटतं की आज प्रत्येक व्यक्ती आणि मुळात ज्यांना असं काही करायचं आहे त्यापैकी कोणीही ते करु शकतं. त्यामुळे आता अॅक्शन चित्रपट करण्यासाठी मी तयार आहे. त्यासाठी मला साइज झीरो होण्याची काहीही गरज नाही."


हेही वाचा : प्रत्यक्ष आयुष्यातील राजकुमारी, अभिनेत्री अदिती राव हैदरी- अभिनेता सिद्धार्थ यांचं शुभमंगल!


तेव्हाच्या आणि आताविषयी बोलताना करीना म्हणाली "मी तेव्हा माझ्या 20 शीत होते आणि माझ्यासाठी कामा करण्याची एक भूक होती. त्यावेळी मला स्वत: ला सिद्ध करायचं होतं. करिअरच्या 25 वर्षानंतर आता माझ्यात एका वेगळ्या प्रकारची भूक आहे. आता मला माझ्या भूमिकेत शांतता हवी आहे आणि मी त्याचा होणारा परिणाम पाहते. कारण मला एक व्यक्ती म्हणून देखील मोठं व्हायचं आहे. त्यानं म्हटलं की माझं म्हणणं आहे की जर तुम्ही 20 आणि 43 या वयाच्या मध्ये एक व्यक्ती म्हणून मोठे होत नसाल तर एक कलाकार म्हणून देखील मोठे होऊ शकणार नाही."