मुंबई : बॉलिवूडच्या लोकप्रिय पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबर रोजी 90 वा वाढदिवस. 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदौरमध्ये लतादीदींचा जन्म झाला. तीसहून अधिक भाषांमध्ये फिल्मी आणि नॉन फिल्मी गाणी लतादीदींनी गायली आहे. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी एकत्र शेकडो सुपरहिट गाणी गायली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

60 व्या शतकात रफी साहेब आणि लता दीदी यांच्यातील वाद भरपूर चर्चेत होता. या दोघांच्या डुएल गाण्यांना प्रेक्षकांनी भरपूर पसंत केलं पण खूप कमी लोकांना माहित आहे की, या दोघांमध्ये 4 वर्षे अबोला होता. वाद इतका विकोपाला गेला होता की, रफी साहेबांनी लता दीदींसोबत गाणं गाणं बंद केलं होतं. 


मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्यात वाद होता तो, गाण्यांवरून गायकाला मिळणाऱ्या रॉयल्टीवरून. लतादीदींच म्हणणं होतं की, संगीत दिग्दर्शकाप्रमाणे गायकांना देखील गाण्यांच्या रॉयल्टीतील काही हिस्सा मिळावा. पण रफी साहेब यांना हे मान्य नव्हतं. त्यांच म्हणणं होतं की, गायकाला गाण्यासाठी मानधन मिळतं मग त्याचा रॉयल्टीवर काही अधिकार नाही. 


1961 मध्ये 'माया' या सिनेमाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी हे मतभेद समोर आले. रेकॉर्डिंगनंतर लतादीदींनी याबाबत रफी साहेबांच म्हणणं विचारलं तेव्हा त्यांना सरळ विरोध केला. तेव्हा लतादीदींनी स्टुडिओत सगळ्यांसमोर सांगितलं की, मी यापुढे रफीसाहेबांसमोर कोणतही गाणं गाणार नाही. आणि त्या नाराज होऊन निघून गेल्या.


पण त्यावेळी रफी साहेब फक्त हसले. कारण त्यांना माहित होतं की, सुरांचं नातं असं अचानक तुटत नाही. असं सांगितलं जातं की, तब्बल 4 वर्षांनी अभिनेत्री नरगिस यांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांच्यातील वाद शमला.