मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज आपल्यात नाही. रविवारी त्यांचं निधन झालं. शिवाजी पार्क इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यांच्या काही आठवणी आणि किस्से यासोबत त्यांची गाणी कायम स्मरणात राहाणारी आहे. लतादीदींचं राहाणीमान अगदीच साधं होतं. पांढरी साडी आणि हातात दोन बांगड्या कपाळाला कुंकू बस एवढाच साधा आणि सरळ साज असायचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लतादीदीच्या दोन खास गोष्टी होत्या. त्यांना लिपस्टीक लावयला कधी आवडली नाही. यामागे खास कारण होतं. दुसरं म्हणजे त्या चांदीचे नाही तर सोन्याचे पैंजण घालायच्या. यामागे देखील खास किस्सा आहे. एकदा या पैजणांवरून लतादीदींना राज कपूर यांनी टोकलं होतं. त्यांना लतादीदींनी उत्तर दिलं त्यानंतर पुन्हा त्यांना यावर कोणी बोललं नाही. 


लतादीदी यांना चांदीचे पैंजण न घालण्याचा सल्ला ज्योतिषांनी दिला होता. त्यांनी सोन्याचे पैंजण घातले. राज कपूर यांची एकदा सहज नजर पैजणांवर पडली. त्यावेळी राज कपूर यांनी त्यांना सोन्याचे पैंजण घालण्यावरून टोकलं. सोनं हे समृद्धीचं सूचक आहे. सोन्याचे पैंजण पायात घालणं अशुभ मानलं जातं. सोनं पायात घालून त्याचा अनादर करू नये.


राज कपूर यांचं बोलणं ऐकल्यानंतर लतादीदींनी शांतपणे उत्तर दिलं. योग्य की अयोग्य मला माहीत नाही. मात्र ज्योतिषांनी सांगितल्यानंतर मी पायात सोन्याचे पैंजण घातले आहेत. त्यामुळे हे पैंजण पायातून मी उतरवणार नाही. तर वडिलांना आवड नाही म्हणून लतादीदी लिपस्टिक लावायच्या नाहीत. त्यांचं राहाणीमानही एकदम साधं होतं. 


लतादीदी का नेसायच्या पांढरी साडी? 
'मी जेव्हाही रंगीत कपडे घालायचे तेव्हा काही ना काही व्हायचं. मला ते आवडायचं नाही. मी जेव्हा केव्हा रंगीत वस्त्र घालायचे तेव्हा असं वाटायचं की कोणीतरी माझ्यावर रंग उधळलाय, मला ते नाही आवडायचं...', बस्स, त्या प्रसंगांपासूनच दीदींनी पांढऱ्या रंगाला पसंती दिली.