आदिनाथ कोठारेच्या `या` लूकची चर्चा?
का केला असा लूक?
मुंबई : आदिनाथ कोठारेने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या फोटोची सध्या भरपूर चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी आदिनाथ कोठारेची पत्नी उर्मिला कोठारेने शेअर केलेल्या एका फोटोतून कळलं होतं की, आदिनाथ कोठारे आपल्या कामात व्यस्त आहे. यामुळे उर्मिला आणि जिजा आदिनाथला भेटायला नांदेडला गेले होते. त्यामुळे सध्या आदिनाथ खूप बिझी असल्याचं समोर आलं. आता आदिनाथने मुलगी जिजासोबत एक फोटो शेअर केला आहे. व्यस्त शेड्युलमधून मुलीसोबत घालवेला हा क्षण त्याने कॅमेऱ्यात कैद करून शेअर केला आहे.
या फोटोत आदिनाथ जिजासोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहे. मात्र या फोटोत आदिनाथचा लूक देखील वेगळा दिसत आहे. या लूकची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण या अगोदर झी मराठीवरील 100 डेज या मालिकेसाठी आदिनाथने असा लूक केला होता. यामध्ये त्याने दाढी काढली असून मिशी ठेवली आहे. त्यामुळे हा लूक खूप ट्रेंड झाला होता.
आता असं कळलंय की, पाणी या आगामी सिनेमासाठी आदिनाथने हा नवा लूक केला असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पाणी या सिनेमांत आदिनाथ मुख्य भूमिका साकारत असून या भूमिकेवर तो चांगलीच मेहनत घेत आहे. एवढेच नव्हे तर या सिनेमाचे दिग्दर्शन देखील आदिनाथच करणार आहे. प्रियांका चोप्राच्या प्रोडक्शन हाऊस ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ मार्फत ‘पाणी’ या मराठी सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा असून या चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे. महाराष्ट्र सध्या पाणी प्रश्नाला सामोरे जात आहे. त्यामुळे हाच धागा या सिनेमात पकडण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात नगदरवाडी येथील दुष्काळग्रस्त खेड्यात राहणाऱ्या एका सामान्य माणसाची कथा प्रेक्षकांना पाणी या सिनेमांत पाहायला मिळणार आहे. दुष्काळग्रस्त भागात राहणाऱ्या जनतेची पाण्यासाठी होणारी दैनंदिन व्यथा, त्यांचं घराबद्दलचं प्रेम, रोजच्या जगण्यातला संघर्ष या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणारी ही कथा आहे. या सिनेमांत आदिनाथ कोठारे, रूचा वैद्य, सुबोध भावे, किशोर कदम, गिरीष जोशी आणि रजित कपूर हे कलाकार दिसणार आहेत.