मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचे आज जगभरात चाहते आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्राने आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीद्वारे आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्राच्या बाळाची चर्चा सतत सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ससोबत प्रियांकाला ट्रोल ही केलं जात आहे. त्यात अनेकांना असा प्रश्न होता की, प्रियांका आणि निकने सरोगसीचा पर्याय का निवडला? आता याचं उत्तर समोर आले आहे.


एका रिपोर्टनुसार, प्रियांकाला सध्या फर्टिलिटीबाबत कोणतीही समस्या नाही. पण आता तिचे वय 39 आहे आणि त्यामुळे बाळ होणे ही गोष्ट तिच्यासाठी फार सोपी गोष्ट नाही. तसेच त्यांच्या कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे ही गोष्ट अधिक कठीण झाली असती. म्हणून या जोडप्याने सरोगसीचा मार्ग निवडल्याचं बोललं जात आहे. 


समोर आलेल्या माहितीनुसार प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचं बाळ 27 व्या आठवड्यात जन्माला आलं. बाळ आणि सरोगेट आई कॅलिफोर्नियाच्या एका रुग्णालयात आहेत असं कळतंय. नियोजनानुसार बाळाचा जन्म एप्रिल महिन्यात होणार होता. मात्र त्या आधीच त्याचा जन्म झाल्यानं बाळाला रुग्णालयातच ठेवण्यात आलं आहे.