मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील सुपरहिट सिनेमा 'नमक हराम' रिलीज होऊन आज 45 वर्षे झाली. 23 नोव्हेंबर 1973 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि मेगास्टार राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते. नमक हराम या सिनेमाशी या दोन कलाकारांच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, नमक हराम हा दुसरा सिनेमा होता जिथे अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना एकत्र दिसले होते. तसेच हा या दोघांचा शेवटचा सिनेमा देखील ठरला. या अगोदर 'आनंद' या सिनेमात हे दोघे एकत्र दिसले होते. 


असं म्हटलं जातं की, नमक हराम या सिनेमाच्यावेळी राजेश खन्ना हळूहळू आपला स्टारडम विसरत चालले होते. तर अमिताभ बच्चन यांची मोठ्या पडद्यावरील जादू सुरू झाली होती. 



नमक हराम या सेटवरील हा किस्सा आहे की, अमिताभ यांना सिनेमाच्या अखेरीस मरायचं असतं. या गोष्टीचा अंदाज राजेश खन्ना यांना अजिबातच नव्हता. पण त्यांना हे माहित  होतं की, सिनेमात ज्या कलाकाराचा शेवटला अंत होतो त्याकडे प्रेक्षकांच जास्त लक्ष असतो. तो कलाकार चाहत्यांच्या अधिक स्मरणात राहतो. 


अशाचवेळी काका म्हणजे राजेश खन्ना यांना याची माहिती मिळते. त्यावेळी त्यांनी बिग बींच्या या सीनला बदलण्यास सांगितले. दिग्दर्शकावर तसा दबाव त्यांनी आणला. आणि दिग्दर्शकाने देखील तो मानला. 


अचानक बदलेल्या शेवटामुळे अमिताभ बच्चन राजेश खन्ना आणि दिग्दर्शकावर नाराज झाले. त्यानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी बिग बींचा शब्द पाळून सिनेमाची कथा बदलली. यानंतर सिनेमाच्या कथेत शेवटी मरण्याचा रोल राजेश खन्ना यांच्याकडे जातो. 


नमक हराम सिनेमा प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी अमिताभ बच्चन यांना जास्त डोक्यावर घेतलं. यामुळे राजेश खन्ना यांनी अमिताभ यांच्यासोबत कधीच काम न करण्याचा निर्णय घेतला.