अभिनयासाठी शिक्षण सोडलं, पण आता बॉलिवूडमधूनही बाहेर... सलमानच्या हिरोईनसोबत असं काय घडलं?
Why Salman Khan Heroine Rambha Quit Acting: अभिनेत्री रंभानं एकेकाळी 90 चं दशक गाजवलं आहे. त्यामुळे कायमच तिची चर्चा राहिली आहे परंतु ही अभिनेत्री मात्र आता अभिनयापासून दूर आहे. परंतु एका मुलाखतीदरम्यान आपण आपल्या बॉलिवूड सोडण्यामागचं कारण तिनं स्पष्ट केले होते.
Salman Khan Heroine Rambha: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपलं बॉलिवूडमधलं करिअर मध्येच सोडून आपल्या घर परिवाराकडे लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे रूपेरी पडद्यावर ते फारच क्वचित दिसतात. परंतु बॉलिवूडशी मात्र ते 'वेल कनेक्टेड' असतात. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चाही होताना दिसते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे सलमानच्या हिरोईनची. अभिनेत्री रंभा यांचा काल वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यामुळे तिची बरीच चर्चा रंगली होती. रंभानं 90 च्या दशकात मोठंमोठ्या हिरोईन्ससोबत काम केलं आहे. सलमान खानसोबतही ही अभिनेत्री झळकली होती. परंतु आता मात्र ती अभिनयापासून दूर आहे आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष केंद्रित करते आहे.
रंभा हिनं 90 च्या दशकात बंधन, जुडवां, जुर्माना, जंग, कहर, घरवाली, बाहरवाली, क्रोध, क्याोंकि में झूठ नहीं बोलता, जानी दुश्मन - एक अनोखी कहानी या लोकप्रिय चित्रपटांतून कामं केली आहे. तिची तेव्हा प्रचंड क्रेझ होती. ती आपल्या आगळ्यावेगळ्या भुमिकेसाठी ओळखली जात होती. परंतु त्यानंतर मात्र तिनं अभिनय सोडून दिला. परंतु या क्षेत्रात येण्यासाठी रंभानं शिक्षणही सोडून दिले होते. त्यानंतर आपलं नशीब आजमावण्यासाठी ती या क्षेत्रात अभिनय सुरू केला. तिचे अनेक सिनेमे गाजले परंतु आपण अभिनय क्षेत्र का सोडलं याबद्दल खुद्द रंभानंच एका मुलाखतीतून खुलासा केला होता.
मध्यंतरी तिनं एका मुलाखतीतून खुलासा केला होता की तिनं बॉलिवूड का सोडलं. त्यानंतर ती कॅनेडाला निघून गेली. तिनं तिथल्या एका बिझनेसमनशी लग्न केले. कॅनेडामध्ये असताना तिचा एक अपघातही झाला होता परंतु त्यातून तिला जबर दुखापत झालेली नव्हती. 2009 साली 'मिड डे'ला दिलेल्या एका मुलाखतीत तिनं सांगितले होते की, ''मला मनासारखे रोल्स मिळत नव्हते त्याचबरोबर मी सारखं तेच तेच रोल करण्यासाठी इच्छुक नव्हते. नावासाठी काम करून पण जर का तुम्हाला तशी ओळख मिळणार नसेल तर त्याशिवाय तुम्ही घरी बसा आणि आपल्या परिवारासह वेळ घालवा.''
हेही वाचा - सलमाननं लग्न केल्यानंतर मी करेन म्हणणारी 'ती' अजूनही सिंगल; पण लग्नाशिवाय झाली आई
ती पुढे म्हणाली की, मला चांगलं काम करायचे आहे. मला जर कोणी वेश्याचा रोल करायला दिला तर मी नक्कीच नाही करणार, मला असं काही करायचं नाही ज्यानं मला आयुष्यभर पाश्चात्ताप वाटेल. आपल्या आयुष्यतर उतार चढाव हे असतातच सोबत मीही अनेकदा छोट्या चित्रपटांमधून कामं केली आहेत.