मुंबई : बॉलिवूड हे असे झगमगते विश्व आहे की इथे नशीब कधीही आणि केव्हाही पलटू शकते. जितक्या पटकन प्रेक्षक कलाकारांना डोक्यावर घेतात तितक्याच पटकन प्रेक्षक त्यांना विसरतातही. संजय नार्वेकर हे अशापैकीच एक नाव. 


मराठमोळा कलाकार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय नार्वेकर हा मराठमोळा कलाकार 'वास्तव' या बॉलिवूड चित्रपटातून घराघरात पोहचला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित वास्तव या चित्रपटाने त्याला नवं वलय दिले. मात्र त्यानंतर संजय नार्वेकर बॉलिवूडपासून दूर राहिला आहे. 


काय असावे कारण ? 


सध्या सिनेक्षेत्र आणि बॉलिवूडपासून संजय नार्वेकर नेमका का दूर झाला आहे? याचे ठोस कारण नाही परंतू अपेक्षित काम मिळत नसल्याने कदाचित त्यांनी बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असावा असा अंदाज आहे. काही वर्षांपूर्वी संजय नार्वेकरांच्या मुलानेही मराठी सिनेमामध्ये पदार्पण केले आहे. 2009 साली संजय नार्वेकरांचा मुलगा 'बोक्या सातबंडे' या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आला होता. तुम्हीही या कलाकाराला रूपेरी पडद्यावर मिस करताय का ?