Kareena and Shahid Kapoor : अभिनेता शाहिद कपूर (Shahid kapoor) आणि अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena kapoor khan) हे बॉलिवूडचं एकेकाळी फेव्हरेट कपल होतं. दोघांच्या अफेअरच्या चर्चा इंडस्ट्रीमध्ये होत होती. जब वी मेट सिनेमादरम्यान असं काय झालं की दोघांचं ब्रेकअप झालं. 2007 मध्ये जब वी मेट (Jab we met) हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. दोघांनी या सिनेमात प्रेक्षकांचं मन जिंकलं. पण ब्रेकअपच्या बातमीनंतर अनेक चाहत्यांना धक्का बसला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिद कपूरने यानेच 'जब वी मेट' सिनेमासाठी तयार केलं होतं. करीनाच्या माहितीनुसार, 'शाहिदने मला या चित्रपटाबद्दल सांगितलं होतं. या चित्रपत्राट स्त्री भूमिकेवर अधिक भर देण्यात आला होता. म्हणून त्याने मला हा चित्रपट करावा असं सांगितलं होतं.'.


अभिनेता शाहिद कपूर आणि करीना यांनी 'चुपचुप के' सिनेमातही एकत्र काम केले होते. पण तो इतका हिट ठरला नव्हता. पण 'जब वी मेट' सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि ही जोडी देखील हीट ठरली. पण या दरम्यानच शाहिद कपूर आणि करिनाचे ब्रेकअप झाले.


करिना कपूरची आई बबिता कपूर आणि मोठी बहीण करिश्मा कपूर यांना हे नातं मान्य नव्हतं असं देखील बोललं जातं. करीना अनेकदा तिच्या निर्मात्यांना शाहीदला तिच्या विरुद्ध साईन करण्यास सांगायची आणि आई बबिता यांना मुलीचे हे वागणे अव्यावसायिक वाटले.


2004 मध्ये त्यांचा फिदा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि तेव्हापासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर दोघेही आपापल्या वेगवेगळ्या चित्रपटात व्यस्त झाले. करीना एकीकडे टशन चित्रपटात काम करत असताना दुसरीकडे शाहिद किस्मत कनेक्शन या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. करीनाचा सैफवर सिक्रेट क्रश होताच, शाहिदचे नाव तिची सह-अभिनेत्री विद्या बालनसोबतही जोडले गेले.