मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा कूल अभिनेता म्हणून ओळखला जातो. सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या व्हिडिओंमध्ये त्याची फनी स्टाइल नेहमीच पाहायला मिळते. पण यावेळी शाहीदचा वेगळाच लूक व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कबीर सिंगची भूमिका साकारणारा अभिनेता व्हिडिओत त्याच्यासारखाच वागताना दिसतोय. ज्यामध्ये त्याने छोट्याशा गोष्टीवरून आजूबाजूच्या लोकांवर आरडा-ओरडा सुरू केला आहे. व्हॅनिटी व्हॅनच्या आत आणि बाहेर शाहिदचा व्हिडिओ शूट करण्यात आला. त्याच्या अशा आरडाओरडामुळे आजूबाजूचे लोकही घाबरून उभे राहतात.


या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः पाहू शकता की, सर्वप्रथम, अभिनेता व्हॅनिटी व्हॅनच्या आत जोरात ओरडतो आणि कॉफी मागतो. त्यानंतर व्हॅनिटी व्हॅनचा दरवाजा उघडून तो बाहेर बसलेल्या लोकांवर आरडा-ओरडा करतो. मग बाहेर आल्यानंतरही तो ओरडताना दिसतो.


पण खरंतर हे, शाहिदने फक्त रील बनवण्यासाठी केलं आणि त्याचा अभिनय खूपच मजेदार दिसत आहे. व्हिडिओसोबतच शाहिदने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,  'इतर कोणाला कॉफी हवी आहे का?' शाहिदच्या व्हिडिओवर एका यूजरने लिहिलं, 'मग कॉफी विथ करण शोमध्ये जा' तर एकाने म्हटलं, 'मी फक्त तुझ्यासोबत कॉफी पिणार आहे'.  अशा अनेक प्रकारच्या कमेंट अभिनेत्याच्या व्हिडिओवर येत असल्याचं पहायला मिळत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


शाहिद कपूरचा 'जर्सी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेता त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. शाहिद कपूरचा आगामी चित्रपट 'जर्सी' 14 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात शाहिदसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'जर्सी' खूप आधी रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे हा सिनेमा अनेक वेळा पुढे ढकलण्यात आला.