घर सोडून हॉटेलमध्ये राहण्यास गेला शाहिद कपूर...काय आहे कारण
बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरने आपले घर सोडलेय आणि तो गोरेगावच्या एका हॉटेलात राहायला गेलाय. खरतरं तो आपल्या पद्मावती या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगच्या सेटवर घरुन येण्याजाण्यासाठी मुंबईतील ट्रॅफिकमुळे बराच वेळ जातो. हा वेळ वाचवण्यासाठी तो गोरेगावच्या हॉटेलमध्ये शिफ्ट झालाय.
मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरने आपले घर सोडलेय आणि तो गोरेगावच्या एका हॉटेलात राहायला गेलाय. खरतरं तो आपल्या पद्मावती या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगच्या सेटवर घरुन येण्याजाण्यासाठी मुंबईतील ट्रॅफिकमुळे बराच वेळ जातो. हा वेळ वाचवण्यासाठी तो गोरेगावच्या हॉटेलमध्ये शिफ्ट झालाय.
मीडियाच्या सूत्रांनुसार, शाहिद कपूर आपले घर सोडून गोरेगावच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहातोय ज्यामुळे शूटिंगदरम्यान कोणताही त्रास होणार नाही. शूटिंग संपेपर्यत शाहिद याच हॉटेलात राहणार आहे.
घरापासून सेटवर येण्याजाण्यासाठी शाहिदचे रोज ४ तास वाया जात. त्यामुळे सेटजवळील हॉटेलमध्ये राहणे त्याने पसंत केलंय.