`या` कारणामुळे होत नाहीये शत्रुघ्न सिन्हाच्या 34 वर्षाच्या मुलीचं लग्न, सलमानसोबत आहे याचं खास कनेक्शन
सोनाक्षीचा बॉयफ्रेण्ड बंटी सचदेवाचं सलनमान सोबत खास कनेक्शन आहे. खरंतर, बंटी सोहेल खानच्या पत्नीचा सख्खा भाऊ आहे.
मुंबई: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता 34 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 2 जून 1987 मध्ये मुंबईत झाला. शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलीने शालेय प्रशिक्षण आर्य विद्या मंदिरमध्ये पुर्ण केलं. त्यानंतर एसएनडीटी यूनिव्हर्सिटीमध्ये सोनाक्षीने फॅशन डिझाईनिंगचा कोर्स देखील पुर्ण केला.सोनाक्षीने कधी फिल्म लाईनमध्ये येण्याचा विचार देखील केला नव्हता. पण सलमान खानमुळे सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. दबंग सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली.
सोनालीच्या पर्सनल बद्दल बोलायचं झालं तर, 34 वर्षाच्या सोनालीचं नावं बऱ्याचदा बंटी सचदेवासोबत जोडलं जातं. बऱ्याच काळापासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. पण तरी दोघांनी अद्याप लग्न केलेलं नाहीये. ज्याचं कारण खुद्द सोनाक्षीने रिवील केलंय.2017 मध्ये सोनाक्षी सिन्हा विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात होतं. सोनाक्षी सिन्हा आणि बंटी सचदेवा यांचा साखरपुडा पार पडणार होता. पण यातील कोणतीच गोष्ट पुर्ण होऊ शकली नाही.
सोनाक्षीचा बॉयफ्रेण्ड बंटी सचदेवाचं सलनमान सोबत खास कनेक्शन आहे. खरंतर, बंटी सोहेल खानच्या पत्नीचा सख्खा भाऊ आहे.सोनाक्षीच्या घरच्यांना देखील बंटी सचदेवा पसंत आहे. त्यामुळे सोनाक्षी कधी लग्न करणार याचीच वाट तिचे घरचे देखील पाहतायेत. बंटी पीआर एजन्सी कॉर्नरस्टोनचा मालक आहे.
सोनाक्षी आणि बंटी अनेक पार्ट्यांना एकत्र हजेरी लावतात. पण सोनाक्षीने दिलेल्या एका मुलाखतीत तिने लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं आहे. सोनाक्षी म्हणते, बंटी इंडिपेंडेन्ट विचाराचा व्यक्ती आहे. आणि त्याला सध्या त्याची बॅचलर लाईफ इन्जॉय करायची आहे." याच कारणामुळे अद्याप सोनाक्षीचं लग्न होऊ शकलेलं नाही.
सोनाक्षीने लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या बुलबुल तरंग या नव्या प्रोजेक्टची घोषणा केलीये. यासोबतच ती भुज: द प्राइड ऑफ इंडिया या सिनेमात अजय देवगणसोबत झळकणार आहे.