सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा श्रीदेवीच्या मृत्यूबाबत उपस्थित केला प्रश्न
श्रीदेवीवर अंत्यसंस्कार होऊन आता आठवडा होईल.
मुंबई : श्रीदेवीवर अंत्यसंस्कार होऊन आता आठवडा होईल.
मात्रा अजूनही सुब्रमण्यम स्वामी सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उभे करत आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी श्रीदेवीच्या मृत्यूनंतर 5 नवे प्रश्न उभे केले होते. श्रीदेवीचा मृत्यू ही काही सामान्य घटना नव्हती. यामध्ये काही तरी गोंधळ असल्याचं म्हटलं आहे.
त्यानंतर आज पुन्हा एकदा श्रीदेवीच्या मृत्यूवर सुब्रमण्यम स्वामींनी प्रश्न उभा केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यात असं म्हटलं आहे की, जेव्हा श्रीदेवीचं पार्थिव शरीर मुंबईत पोहोचल तेव्हा मुंबई पोलिसांनी पोस्टमॉर्टम करण्यास का नकरा दिला? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
काय म्हणाले बोनी कपूर?
कोमल यांनी सांगितलं की, श्रीदेवी ज्या हॉटेलमध्ये थांबली होती त्या रूमची ड्युबलिकेट चावी बोनी कपूर यांच्याकडे होती. तसेच स्टाफला सांगितलं की, माझं सामान नंतर तुम्ही घेऊन या. त्या चावीने दरवाजा उघडून श्रीदेवीला सरप्राईज दिलं. त्यानंतर दोघांनी जवळपास अर्धातास गप्पा मारल्या. त्यांनतर बोनी कपूर यांनी आपण डिनरला जाऊ असं सांगितलं. त्यानंतर श्रीदेवी आंघोळीसाठी गेल्या आणि बोनी कपूर त्यांची वाट पाहत बाहेर टीव्ही बघत होते. मात्र बराच वेळी श्रीदेवी न आल्यामुळे त्यांनी तिला आवाज दिला. मात्र कोणतंच उत्तर न आल्यामुळे त्यांनी दार उघडलं. तर श्रीदेवी बाथटबमध्ये बुडाल्या होत्या.