R Madhavan ला अनोळखा व्यक्ती का म्हणतेय `डॅडी`? नक्की काय आहे कनेक्शन?
त्या व्यक्तीचं आणि आर माधनवचं नक्की काय आहे कनेक्शन?
मुंबई : अभिनेता आर माधनवच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. माधनव ज्या ठिकाणी तेथे त्याला प्रेम आणि सन्मान मिळोतो. सोशल मीडियावर देखील तो कायम ऍक्टिव्ह असतो. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत तो सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. नुकताचं सोशल मीडियावर चाहत्यांसोबत संवाद साधणाऱ्या आर माधवनला एका व्यक्तीने 'डॅडी' म्हणून संबोधलं.
एखाद्या अनोळखी व्यक्तीने डॅडी म्हणून हाक मारल्यानंतर माधवनने प्रतिक्रिया दिली. आर माधवनने एक छोटा व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये तो घातलेल्या पांढऱ्या पड्यांबद्दल बोलताना दिसत आहे. याचदरम्यान माधवनच्या एका चाहतीने त्याला 'डॅडी' म्हणून हाक मारली.
यावर कमेंट करत माधवन म्हणाला, 'अंकल ठिक आहे... तु मला 'डॅडी' म्हणून हाक मारली तर तुझ्या वडिलांना वाईट वाटेल. तुझे वडील नाराज व्हावे असं मला वाटत नाही...' माधवनचं उत्तर अन्य चाहत्यांना फार आवडलं.
माधवनच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तो लवकरचं 'रॉकेट्री द नंबी इफेक्ट' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. एवढंच नाही तर 'रॉकेट्री द नंबी इफेक्ट' चित्रपटाच्या माध्यमातून माधवन दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.