मुंबई : देव आनंद जी यांची गेल्या जमान्यात लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये गणना होते. आज जरी ते या जगात नसले तरी पण त्यांची स्टाइल आणि त्याची डायलॉग डिलिव्हरी त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात आहे. देव आनंद यांची स्टाईल त्यावेळी खूप प्रसिद्ध झाली होती. जिद्दी, नौ दो ग्यारह, हम दोनों, जॉनी मेरा नाम, सीआईडी, महल, हरे कृष्णा हरे राम, गाइड और कालापानी या चित्रपटांतील देव आनंद यांच्या भूमिका लोकांच्या आजही स्मरणात आहेत. देव आनंद यांची स्टाईल इतकी मनमोहक होती की, सगळ्यांनाच त्याचं वेड लागलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देव आनंद यांचा ऑन-स्क्रीन रोमान्स असो किंवा नायिकांसोबतच्या त्याच्या नात्याबद्दलच्या चर्चा असो, ते कायमच चर्चेत असतं.  देव आनंद यांना त्यांचे चाहते देव साहेब असंही म्हणत. देव आनंद यांची पांढरा शर्ट आणि काळा कोट ही स्टाइल खूप लोकप्रिय झाली. पण कोर्टने त्यांना काळा कोट घालण्यास बंदी का घातली? आज आम्ही तुम्हाला आमच्या खास सिरीज 'बॉलिवूड रिवाइंड'मध्ये या कथेबद्दल सांगणार आहोत.


काय होतं बॅन करण्यामागचं खरं कारण?  
सेलेब्सची स्टाइल कॉपी करण्याचा प्रयत्न करणं किंवा त्यांच्या स्टाइलमागे वेडं होणं हे काही नवीन नाही. पण देव साहेबांच्या  पांढरा शर्ट आणि काळ्या कोटच्या स्टाइलची जादू काही वेगळीच होती हे तुम्हाला माहीत आहे का. काळ्या कोटमध्ये त्यांना पाहण्याचा आनंद काही वेगळाच होता. देव आनंद साहेबांनाही सार्वजनिक ठिकाणी काळा कोट घालण्यास मनाई होती. या मागचं कारणही फार विचित्र होतं. 


रिपोर्ट्सनुसार, देव साहेब जेव्हा सार्वजनिक ठिकाणी काळा कोट घालून जायचे तेव्हा मुली त्यांच्या लूकसाठी वेड्या होत्या. एवढंच नव्हेतर छतावरून उडी मारून जीवन संपवण्याच्याही तयारीत तरुणी असायच्या.  यामुळेच देव साहेबांना सार्वजनिक ठिकाणी काळा कोट घालण्यास मनाई करण्यात आली होती. देव साहेबांची लोकप्रियता त्यावेळी खूप होती. फॅशन आयकॉन म्हणूनही त्यांना ओळखलं जात.  


देव साहेब यांचा ऑरा
देव साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास 100 चित्रपट केले. त्यांच्या अभिनयाच्या जादूने त्यावेळी चाहत्यांना भुरळ पाडली. विशेषतः गाण्यांबद्दल बोलायचं झालं तर त्यांची अनेक चित्रपटातील गाणी खूप गाजली. फूलों के रंग से, पल भर के लिए, गाता रहे मेरा दिल, छोड़ दो आंचल और खोया-खोया चांद अशी अनेक गाणी आजही चाहत्यांच्या ओठावर आहेत. देव आनंद साहेब यांनी ३ डिसेंबर २०११ रोजी  या जगाचा निरोप घेतला