मुंबई : 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून प्रसिद्ध झालेला अभिनेता करण मेहरा आजही त्याच्या चाहत्यांच्या मनात नैतिकची भूमिका आहे. मात्र गेल्या काही वर्षांत करणने त्याच्या आयुष्यात एक वाईट टप्पा पाहिला आहे. त्या वेदनेतही त्याने आपलं काम सुरू ठेवलं आणि आजही जीवनाच्या या आव्हानाशी लढत आहे. करणने नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर वर्षभरापासून करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल यांचा खटला न्यायालयात सुरू आहे. करणला 2021 मध्ये घरगुती हिंसाचारासाठी तुरुंगातही जावं लागलं होतं. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. यानंतर निशाने करणचे आई-वडील आणि भावाविरुद्ध हुंडाबळी, लैंगिक हिंसाचार यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला. आता न्यायालयाने या एफआयआरला स्थगिती देऊन करणला दिलासा दिला आहे. करण आता कोर्टात केस लढणार आहे.


मुलासाठी गप्प बसलो, आता सत्यासाठी लढणार
करण त्याच्या आणि निशाच्या नात्यावर स्पष्टपणे बोलला. 14 वर्षे एकत्र राहिल्यानंतर फसवणूक झाली तर तुटणं साहजिकच आहे. असं तो म्हणाला. आपण प्रेमासाठी सर्व काही करू इच्छितो. पण मी ज्याला प्रेम समजत होतो ती फसवणूक ठरली. सुरुवातीला मुलाच्या भल्यासाठी तो मोठा झाल्यावर आई-वडिलांचा लढा कसा पाहणार या विचाराने मी गप्प राहिलो. पण दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत गेली. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं त्यांनं सांगितलं. आणखी एक माणूस वर्षभरापासून घरात राहत आहे. ज्याच्या बरोबरीने माझा छळ केला गेला आणि खोटे आरोप केले गेले.


वडिल-भावावर अनैसर्गिक सेक्स केल्याचा खोटा आरोप
निशाने माझे आई-वडील आणि भावावर अनैसर्गिक सेक्स केल्याचा आरोप केला आहे. ज्याच्यासोबत हे खरंच घडतं, त्याच्या वेदना समजून घ्या. त्याचा हृदयावर आणि मनावर किती खोल परिणाम झाला असावा. ही काही छोटी गोष्ट नाही. आपण महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतो. पण अनेक बाबतीत त्याचा गैरवापर होतो.


महिलांनी कायद्याला खेळण्यासारखं बनवलं आहे
करणने पुढे सांगितलं की, हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचाराची ९५ टक्के प्रकरणं खोटी आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी केलेला कायदा महिलांनी खेळण्यासारखा बनवला आहे. मुलांवरही अत्याचार होतात. आजही बरोबर असल्याने मला या खेळातून जावं लागतं. ते म्हणाले की मी महिलांचा आदर करतो. आजपर्यंत ना कोणाला शिवीगाळ केली ना कोणावर हात उगारला. त्यानंतरही मला खोट्या प्रकरणात गोवण्यात आलं.