Movie On Mirzapur Series: लोकप्रिय वेब सीरिज 'मिर्झापूर 3' ही सर्वाधिक चर्चेत राहिलेली सीरिज आहे. या लोकप्रिय वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनला पहिल्या दोन सीझनइतके प्रेम प्रेक्षकांकडून मिळाले नसेल पण पात्रांची लोकप्रियता आजही कायम आहे. आता सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांवरून असा अंदाज लावला जात आहे की, 'मिर्झापूर'वर लवकरच चित्रपट बनवला जाणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा एक सुपरस्टार कालीन भैयाची भूमिका साकारताना दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार 'मिर्झापूर'वर बनणाऱ्या चित्रपटात हृतिक रोशन 'कालीन भैया'ची भूमिका साकारणार आहे. या चर्चेनंतर पंकज त्रिपाठीचे चाहते हृतिक रोशनची त्याच्याशी तुलना करू लागले आहेत. या भूमिकेसाठी हृतिक रोशन योग्य नसल्याचे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सांगितले आहे. या भूमिकेत तो योग्य दिसणार नाही असं मत प्रेक्षकांनी व्यक्त केलं आहे. 


दिग्दर्शक काय म्हणाले? 


सोशल मीडियावर सुरू असलेल्या या अफवांवर दिग्दर्शक गुरमीत सिंग यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, यावर कोणतेही अधिकृत भाष्य न करता त्यांनी  निर्माते आणि स्टुडिओचे लोक याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट बनणार की नाही यावर तेच लोक निर्णय घेऊ शकतील असं त्यांनी म्हटलं आहे. 


'मिर्झापूर'मधून पंकज त्रिपाठीला मिळाली प्रसिद्धी


'मिर्झापूर' या लोकप्रिय वेब सीरिजचा पहिला सीझन 2018 मध्ये आला होता. या सीझननेच पंकज त्रिपाठीला इंडस्ट्रीत आपले स्थान दिले. 'मिर्झापूर'ची लोकप्रियता सुरुवातीपासूनच कायम आहे. या सीरिजचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. त्यामुळे आता 'मिर्झापूर'वर चित्रपट तयार होणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


हृतिक रोशनचा आगामी चित्रपट


हृतिक रोशन  शेवटचा 'फायटर' या चित्रपटात दिसला होता. यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि अनिल कपूरसारखे कलाकार होते. मात्र, हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे कमाई करू शकला नाही. सध्या हृतिक रोशन त्याचा आगामी चित्रपट 'वॉर 2' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात जूनियर एनटीआर आणि कियारा अडवाणीसारखे कलाकारही दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.