Arjun Kapoor Not In Pushpa 2 : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन  (Allu Arjun)चा 'पुष्पा' चित्रपट देशभरातील प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाला आह. आता 'पुष्पा 2' (Pushpa 2) च्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांच्या नजरा चित्रपटाशी संबंधित प्रत्येक छोट्या-मोठ्या अपडेटवर असतात. बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर  (Arjun Kapoor)  'पुष्पा 2' मध्ये एका पोलिस अधिकाऱ्याच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे. यासंदर्भात दिग्दर्शक सुकुमार यांच्याशी चर्चा सुरू आहे. आता यात किती तथ्य आहे. हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन नसणार 'पुष्‍पा 2'चा हिस्‍सा 
रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की, 'पुष्पा 2' मध्ये अर्जुन कपूर फहद फासिलची जागा घेणार आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटात  पुष्पासोबत भांडताना दिसणार आहे. मात्र, निर्माते नवीन येरणेनी यांनी सर्व अटकळांना पूर्णविराम देत अर्जुन 'पुष्पा 2'चा भाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे.


फवादची जागा कोणी घेत नाही
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत निर्मात्यांनी अर्जुनशी संबंधित बातम्यांचं सत्य उघड केलं आहे. फहद फासिलची जागा कोणीही घेत नसल्याची पुष्टीही झाली आहे. तो या चित्रपटात भूमिका साकारत आहे. त्यामुळे अर्जुनबाबत समोर येत असलेल्या बातम्या शंभर टक्के चुकीच्या आहेत.


या महिन्यात शूटिंग सुरू होणार आहे
निर्मात्यांनी असंही सांगितलं आहे की, 'पुष्पा 2' चं शूटिंग या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. 20 ते 30 तारखेच्या दरम्यान आम्ही शूटिंग सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या चित्रपटाचं चित्रीकरण हैदराबादमध्ये होणार आहे.  


याआधी, 'पुष्पा 2' बद्दल बोलताना रश्मिका मंदान्ना म्हणाली होती की, 'गुडबाय' रिलीज झाल्यानंतर लवकरच चित्रपटाचं शूटिंग सुरू होईल. यावेळी हा सिनेमा आणखी चांगला आणि मोठा चित्रपट असेल. रश्मिकाचा 'गुडबाय' रिलीज झाला आहे. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. ज्यामध्ये तिला अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.