Sidhu Moosewala Murder Goldy Brar: गँगस्टर गोल्डी बराडने (Goldy Brar) एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपणच सिद्धूी मुसेवालाची हत्या केल्याचा धक्कादायक दावा केला आहे. तसेच आपण अभिनेता सलमान खानला नक्की जिवे मारणार असंही गोल्डीने या मुलाखतीत म्हटलं आहे. जोपर्यंत 1998 साला केलेल्या काळवीट हत्या प्रकरणामध्ये तो बिश्नोई समाजाची माफी मागत नाही तोपर्यंत त्याला सोडणार नाही. राजस्थानमधील बिश्नोई समाज काळवीटाला देवासमान मानतो. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये गोल्डी बराडने सिद्धू मुसेवालाची हत्या का केली याची कारणही सांगितली आहेत. तसेच मी सलमानलाही नक्कीच संपवणार अशी धमकी गोल्डीने दिली आहे. गोल्डी हा सध्या कॅनडामध्ये वास्तव्यास असल्याचं समजतं.


सलमानला संपवणं हेच ध्येय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानला संपवणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे असंही गोल्डीने या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. "भाईने (लॉरेन्स बिश्नोईने) माफी देणार नसल्याचं म्हटलं आहे. तो माफी योग्य वाटेल तेव्हाच त्याला माफी दिली जाईल. आम्ही यापूर्वीही म्हटलं आहे त्याप्रमाणे हे केवळ सलमान खान पुरतं नाही. आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आमच्या शत्रूंना संपवण्याचा प्रयत्न करत राहाणार. सलमान आमच्या टार्गेटवर आहे यात काही शंकाच नाही. आम्ही प्रयत्न करत राहणार आणि जेव्हा आम्हाला यश येईल तेव्हा... तुम्हाला ठाऊकच आहे," असं गोल्डीने म्हटलं आहे. 


सलमानला या आधीही धमकी


मागील काही काळापासून सलमानला सातत्याने धमकीचे फोन येत आहेत. त्याला जीवे मारण्यासंदर्भातील धमकी एका पत्रातूनही देण्यात आली आहे. तेव्हापासूनच मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. या धमकी प्रकरणानंतर सलमान खानने मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेऊन शस्त्र परवान्यासंदर्भातील विचारणा केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. सलमानच्या सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या राहत्या घरापर्यंत लॉरेन्स बिश्नोई गँगने पत्राच्या माध्यमातून त्याला संपवण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली होती.


सिद्धू मुसेवालाला मारलं कारण...


गोल्डीने आपणच सिद्धू मुसेवालाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तो फार उद्धटपणे वागत होता. त्याला धडा शिकवणं गरजेचं होतं, असं म्हणत गोल्डीने सिद्धूच्या हत्येचं समर्थन केलं आहे. "सिद्धू मुसेवाला हा फार इगो असलेला व्यक्ती होता. त्याने त्याच्या राजकीय आणि आर्थिक सामर्थ्याचा चुकीचा वापर केला. त्याला धडा शिकवणं आवश्यक होतं आणि तो त्याला शिकवला," असं गोल्डीने म्हटलं आहे. 29 मे 2022 रोजी पंजाबमधील मेनसा येथे अंदाधुंद गोळीबारामध्ये सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये सद्या लॉरेन्स बिश्नोईसहीत सर्वच हल्लेखोर तुरुंगामध्ये असून कोर्टात प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.