मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भंसाळींच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेल्या 'पद्मावती'चे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शूटिंग दरम्यानचे अडथळे पार करत आता हा चित्रपट अंतिम टप्प्यात पोहचला आहे. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात येईल. 


बॉलिवूड चित्रपटांपैकी 'पद्मावती' हा सिनेमा बिग बजेट प्रोजेक्ट आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केलेल्या 'बाहुबली'ला तोडीस तोड ठरेल असा अनेकांच्या अपेक्षाही आहेत.  
काही मीडिया रिपोर्टनुसार,पद्मावती ५०० पेक्षा अधिक थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. तसेच ८ हजार स्क्रिनवर दिसणार आहे. चित्रपटाचे बजेट सुमारे १७५ कोटींचे आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनवर सुमारे  १२ कोटी खर्च करण्यात आला आहे. 


पद्मावती चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. राणी पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका झळकणार आहे तर अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत रणवीर आणि शाहिद कपूर  राजा रावल रत्न सिंगच्या भूमिकेत झळकणार आहे. शाहिदने ही भूमिका साकारण्यासाठी सहा प्रकारच्या तलवारबाजीचेही खास प्रशिक्षण घेतले आहे.