नवी दिल्ली : अभिनेता सोनू सूदने शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर सोनू अभिनय सोडून राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. या भेटीनंतर केजरीवाल यांनी एक पत्रकार परिषद घेतली. परिषदेत ते म्हणाले, 'सोनू सूद सर्वांच्या मदतीसाठी प्रयत्न करत असतो देशासाठी तो एक प्रेरणास्थानी आहे.' या भेटीमध्ये नक्की कोणत्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली असे प्रश्न देखील विचारण्यात येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले, 'आमच्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.' यावेळी मेंटर कार्यक्रमाचा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून सोनूची निवड करण्यात आली. त्यामुळे सोनू आता समाजसेवेसाठी कोणती कामे करेल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
 
सोनू म्हणाला, 'राजकारणावर चर्चा झालेली नाही. मुलांच्या भविष्याचा प्रश्न हा राजकारणापेक्षा मोठा प्रश्न आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणात सक्रिय होण्यासाठी ऑफर येत आहेत. पण राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही. ज्यांचे विचार चांगले आहेत, त्यांना दिशा नक्की मिळते...' 


असं म्हणत सोनूने राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, सोनूच्या समाजसेवेची चर्चा आता भारतातच नाही तर जगभरात होत आहे. तो आता भारतीय माध्यमांमध्येही हिरो बनला आहे. 


या समाजसेवेमुळे सोनूचं संपूर्ण जगात एक वेगळं स्थान निर्माण झालं आहे. त्याच्या कार्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. आपल्या करिअर व्यतिरिक्त सोनू समाजसेवेसाठी आपल सगळं पणाला लावतो.