Tom Cruise Olympic Video : हॉलिवूड अभिनेका टॉम क्रुझच्या अ‍ॅक्शन आणि लूक्सचे लाखो चाहते आहेत. दरम्यान, टॉम क्रुझनं नुकतीच पॅरिस ओलम्पिक 2024 च्या क्लोझिंग सेरेमनीमध्ये हजेरी लावली होती. टॉम क्रुझनं या क्लोझिंग सेरेमनीला त्याच्या अंदाजात शेवट केला. त्यानंतर तो ओलम्पिकचा झेंडा घेऊन ओलम्पिक गेम्स 2028 साठी निघाला. या सगळ्यात पॅरिस ओलम्पिक 2024 मध्ये टॉम क्रुझसोबत असं काही घडलं ज्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्यावरून आता पुन्हा एकदा 'महिला-पुरुष समानता...', 'महिला-पुरुष एकमेकांचा किती आदर करतात' यावर वाद सुरु झाला आहे. टॉम क्रुझला किस करण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे आता त्यावरच चांगली चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅरिस ओलम्पिक 2024 च्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये 70 हजार पेक्षा जास्त प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. तर त्याच्या हटके अंदाजात टॉम क्रुझ हा तिथे पोहोचला होता. त्यावेळी टॉम क्रुझला तिथे असलेल्या प्रेक्षकांमध्ये पोहोचला होता. टॉम क्रुझला पाहून त्याच्या एका चाहतीनं त्याला किसं केलं. खरंतर, टॉम हा यावेळी त्यांच्या चाहत्यांसोबत सेल्फी घेण्यासाठी पोहोचला होता. तेव्हाच या महिला चाहतीनं तिच्या फोनमध्ये टॉमला किस करण्याचा पूर्ण क्षण शूट केला. 



पॅरिस ओलम्पिक 2024 क्लोझिंग सेरेमनीमध्ये टॉमसोबत झालेल्या या घटनेवर नेटकरी संतापले आहेत. मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की टॉमच्या जागी तिथे महिला स्टार असती तर आणि महिला चाहतीच्या जागी पुरुष चाहता असता तर किती मोठा वाद झाला असता. एका नेटकऱ्यानं म्हटलं की 'त्या महिलेनं टॉमला विचारलं होतं का?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'महिलेनं टॉमला किस करण्यावर लोक हसत होते, हे खूप वाईट आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'जर हे फीमेल सेलिब्रिटी असती तर काय इतकं लोक हसले असते का? टॉमसोबत असं व्हायला नको होतं.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'किती वाईट महिला प्रेक्षक आहे ही, कोणाच्याही पर्सनल स्पेसचा आदर करायचा तर ते नाही.'



हेही वाचा : विनोद खन्नासमोर कोणती हिरोईन मारायची अश्लील जोक? वडीलसुद्धा करायचे सपोर्ट



दरम्यान, टॉम क्रुझनं पॅरिस ओलम्पिक 2024 मध्ये एक सेल्फी क्लिक केला. हा फोटो सोशल मीडियावर देखील त्यानं शेअर केला. हा फोटो शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं की 'पॅरिस तुझे आभार, आता LA च्या मार्गावर...'