Javed Akhtar Controversy: प्रसिद्ध लेखक आणि शायर जावेद अख्तर(Javed Akhtar) पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. जर पुरुषांना अनेक पत्नी ठेवण्याचा अधिकार आहे. तर, महिलांना देखील एक पेक्षा अधिक नवरे ठेवण्याचा अधिकार असला असं मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आहे. हे समानतेच्या विरोधात असल्याचा दावा देखील अख्तर यांनी केला आहे. त्यांच्या या व्यक्तव्याचा विरोध केला जात आहे.अखिल भारतीय शिया चांद कमिटीचे अध्यक्ष मौलाना सय्यद सैफ अब्बास नक्वी यांनी जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. जावेद अख्तर यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी केले आहे. समान नागरी कायद्याबाबत प्रश्न विचारला त्यांनी विवाह थेट विवाह व्यवस्थेवरच भाष्य केले आहे. जर पुरुषांना अनेक विवाह करण्याचा अधिकार आहे तर अशा प्रकारचा अधिकार महिलांना देखील मिळाले पाहिजेत.  जावेद अख्तर यांचे वक्तव्य हे देशाच्या संस्कृतीविरोधात असल्याचे मत सय्यद सैफ अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले आहे. जावेद अख्तर हे फक्त चर्चत राहण्यासाठी महिलांना भडकवणारी वक्तव्य करत आहेत. त्यांनी आपले वक्तव्य मागे घेवून माफी मागावी असं देखील ते म्हणाले. 


वादग्रस्त विधानावरुन जावेद अख्तर नेहमी चर्चेत


वादग्रस्त विधानावरुन जावेद अख्तर नेहमी चर्चेत असतात. तालिबानमध्ये काही इस्लामी संघटना नागरिकांना त्रास देतात.  धर्माच्या नावावरती तालिबानमध्ये लोकांचा छळ केला जात आहे. अशा तालिबानी मानसिकतेचे लोक म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आणि या संस्थांना समर्थन करणारे लोकं आहेत असं वक्तव्य अख्तर यांनी केले होते.  अख्तर यांनी संघाची तुलना तालिबानशी केली होती. संघ आणि तालिबान या दोन्हीं संघटना धार्मिक कट्टरपंथीय संघटना असल्याचे जावेद अख्तर यांनी म्हटले होती. या वक्तव्याविरोधा त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता.