मुंबई : बऱ्याच दिवसांपासून लैंगिक शोषणाविषयी आवाज उठवणाऱ्यांमध्ये काही प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावं पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे. लैंगिक शोषण आणि अत्याचाराविरोधात बरीच वर्षे मौन बाळगलेल्या अनेकांनीही या मुद्द्यावर व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. पण, कुठेतरी आणि काही बाबतीच #MeToo या चळवळीचा गैरवापर होता कामा नये, हा महत्त्वाचा मुद्दाही कलाविश्वात तितक्याच प्रकर्षाने मांडण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक महेश भट्ट यांनी सध्या चर्चेत असणाऱ्यया मुद्द्याच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची बाब अधोरेखित केली आहे. 


महिलांनी सध्या घेतलेली भूमिका आणि अत्याचाराविरोधात उचललेला आवाज या सर्व गोष्टी अतिशय प्रशंसनीय आणि तितक्याच गरजेच्या आहेत, असं ते म्हणाले.


हा मुद्दा फक्त कलाविश्वापुरताच सीमित नाही, असं म्हणत महिलांनी किंवा इतर कोणीही #MeToo चा चुकीच्या पद्धतीने वापर करु नये, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. 



कोणत्याही व्यक्तीवर लावण्यात आलेल्या व्यक्तीचे आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे दोषींच्या नजरेतून पाहिलं जाऊ नये, असं मत त्यांनी मांडलं. 


जगातील प्रत्येक पुरुष हा लैंगिक शोषण करतच असेल असं नाही. त्याचप्रमाणे प्रत्क महिला ही लैंगिक शोषणाची पीडित असेलच असं नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी असे अंदाज बांधणं गरजेचं नाही, याच मतावर भट्ट ठाम आहेत. 


अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने एका मुलाखतीदरम्यान नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. ज्यानंतर अनेकांच्याच भुवया उंचावल्या. तनुश्रीच्या या आरोपांमागोमाग आता इतरही अभिनेत्री आणि कलाविश्वत कार्यरत असणाऱ्या अनेकांनी या मुद्द्यावर स्पष्टपणे बोलण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे बरीच मंडळी अडचणीतही आली आहेत.