पुणे : अभिनेत्री तनुश्री दत्तामुळे उदयास आलेले #Metoo चे वादळ अद्यापही शमलेले नाही. मुळात अमेरिकेत उदयास आलेली ही मोहिम तनुश्रीने भारतात रूजवली. त्यानंतर अनेकांनी तिला पाठींबा दिला. तर काहींनी तिचा विरोध देखील केला. माहाराष्ट्र महिला आयोगाकडे तिने आपल्यावर झालेल्या अत्याचारांसंबंधीत निवेदन दिले होते. याप्रकरणी तनुश्रीने केलेल सर्व आरोप महिला आयोगाकडून फेटाळण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला आयोगाच्या म्हणण्यानुसार, 'लैंगिक आत्याचाप्रकरणी तनुश्रीला आयोगाकडून समन्स जारी करण्यात आले होते. तरीही ती महिला आयोगाच्या कधीही समोर आली नाही. तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून तिने आरोप दाखल केले होते.'  आज सकाळी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी याबाबत खुलासा केला आहे. 


तनुश्रीने केलेल्या आरोपांनंतर संबंधीत सर्व व्यक्तींना आयोगाने नोटिस पाठवली होती. खुद्द तनुश्रीने आरोप दाखल करणे अपेक्षित होते. पण तिने असे केले नसल्याची माहिती विजया राहटकर यांनी दिली आहे. बुधवारी पुणे येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत महिला आयोगाने तनुश्री दत्ताने दाखल केलेले सर्व आरोप फेटाळले.