Worlds richest couple in entertainment industry : श्रीमंतीचा मुद्दा जेव्हाजेव्हा चर्चेत येतो तेव्हा काही नावांची प्रचंड चर्चा होते. याच श्रीमंतीच्या यादीत अग्रस्थानानी कोणाची वर्णी लागली आहे माहितीये? जाणून धक्का बसेल पण श्रीमंतीच्या बाबतीत शाहरुख - गौरी, सैफ- करीना, बिग बी- जया बच्चन यांना मागे टाकत सरशी पाहायला मिळतेय ती म्हणजे एका दाक्षिणात्य जोडप्याची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाक्षिणात्य कलाविश्वामध्ये कमालीची लोकप्रिय कुटुंबातील ही जोडी चाहत्यांच्या मनाचा ठाव कायमच घेत असते. ही जोडी म्हणजे अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी यांची. दाक्षिणात्य कलाजगतामध्ये प्रतिष्ठीत कुटुंबांपैकी एक असणाऱ्या कोन्नीडेला कुटुंबातील हा अभिनेता म्हणजे साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा आणि उपासना ही त्यांची सुन. 


जागतिक स्तरावर ही जोडी म्हणजे सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रिटी जोडपं आहे. उपासना आणि राम चरण या दोघांच्याही संपत्तीचा एकूण आकडा 2500 कोटी रुपये इतका असून, याममध्ये राम चरणच्या पत्नीची म्हणजे उपासनाची एकूण संपत्ती आहे 1130 कोटी रुपये. तर या अभिनेत्याच्या संपत्तीचा आकडा आहे 1370 कोटी रुपये. 


उपलब्ध माहितीनुसार उपासनाच्या संपत्तीचा प्रमुख स्त्रोत हा 'अपोलो लाईफ वेलनेस चेन' असून, राम चरण अभिनयाव्यतिरिक्त चित्रपट निर्मिती आणि रिअल इस्टेट क्षेत्रातही सक्रीय असल्याचं सांगितलं जातं. जगभरातील सर्वाधिक श्रीमंत जोडप्यांमध्ये या जोडीचंही नाव घेतलं जातं. 


हेसुद्धा वाचा : मंत्रिपद, अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि एकनाथ शिंदेंची अडचण...; उदय सामंत स्पष्टच बोलले 


राम चरण आणि उपासना या दोघांनीही लग्नाच्या कैक वर्षांनंतर त्यांच्या नात्यात एका चिमुकलीचं स्वागत केलं. नातीच्या जन्मानंतर अभिनेते चिरंजीवी यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. जिथं जागतिक स्तरावर कलाकार मंडळी कमाईच्या विविध स्त्रोतांच्या आधारे श्रीमंतीचे नवनवीन विक्रम रचत असतात तिथंच या दाक्षिणात्य सेलिब्रिटी जोडप्यानं मात्र अनेक नवे आदर्श प्रस्थापित करत श्रीमंतीचे नवनवीन विक्रम आणि गडगंज श्रीमंतीचा डोलारा उभा केल्याचं पाहायला मिळालं आहे. 


आगामी चित्रपट आणि कारकिर्द... 


येत्या काळात राम चरण 'गेम चेंजर' या चित्रपटामध्ये झळकणार असून, इथं त्याच्यासोबत अभिनेत्री किआरा अडवाणी स्क्रीन शेअर करणार आहे. 10 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, आतापासूनच या चित्रपटासाठीची उत्सुकता चाहत्यांच्या वर्तुळात पाहायला मिळत आहे.