मुंबई : सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) चा मोठा चाहता वर्ग आहे. सलमानचे चाहते त्याचे स्टाइल, सिनेमे आणि अभिनयाचे दिवाने आहेत. भाईजानने काहीही केलं तरी त्याच्या चाहत्यांना त्याच्या गोष्टी आवडतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच सलमान खानने सोशल मीडियावर एक शर्टलेस फोटो शेअर केलाय. यामध्ये तो काळ्या घोड्यावर बसला आहे. सलमानच्या या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोला सलमानने कॅप्शन दिलंय की'बींग ह्यूमनचं थंडीतील कलेक्शन लवकरच येणार आहे.'



सलमान खान त्याच्या आगामी सिनेमांत अभिनेत्री दिशा पटानीसोबत 'राधे: यॉर मोस्ट वॉन्टेड भाई'मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहे. या सिनेमात मेघा आकाश, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ दिसणार आहे.



या सिनेमानंतर सलमान खान 'कभी ईद कभी दिवाली' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सलमानसोबत साऊथची स्टार पूजा हेगडे दिसणार आहे.