यामी गौतम घेतेय पोल डान्सचे धडे...
बॉलिवूड सेलिब्रेटीजमध्ये पोल डान्सची क्रेझ वाढली आहे.
मुंबई : बॉलिवूड सेलिब्रेटीजमध्ये पोल डान्सची क्रेझ वाढली आहे. कतरिना कैफ, मलायका अरोरा, जॅकलिन फर्नांडीस यांच्या पोल डान्सनंतर आता अभिनेत्री यामी गौतमनेही पोल डान्स शिकायला सुरुवात केली आहे. पोल डान्सकडे आता फिटनेस आणि एक्सरसाईज म्हणून पाहिले जात आहे. यामुळे शरीरातील एक्ट्रा कॅलरीज कमी होऊन तुम्ही हेल्दी आणि फिट रहाल. पोल डान्स दररोज केल्यास 1 तासात 200 ते 450 कॅलरीज बर्न होतात. यामी सेलिब्रेटी प्रशिक्षक आरिफा भिंडरवाला यांच्याकडून पोल डान्सचे धडे घेत आहेत.
पहा तिच्या सरावाचा व्हिडिओ...
यामीचा अनुभव
याबद्दलचा आपला अनुभव शेअर करताना यामी म्हणते, फिटनेस आणि डान्सची क्रेझ यामुळे मला पोल डान्सची कल्पना सुचली. पोल डान्समुळे तुम्ही गोष्टी एन्जॉय करता. तुमची फिटनेसची लेव्हल वाढते. माझ्या मर्यादा ओलांडण्यासाठी मी हा प्रयोग करायचे ठरवले. त्यामुळे पोल डान्सची कल्पना ही कोणीही माझ्यावर लादली नसून मी माझ्या स्वतःच्या इच्छेने आणि पॅशनने शिकत आहे.
पोल डान्सचे फायदे
पोल डान्समुळे संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. फॅट्स कमी होऊन स्नायू मजबूत होतात. पोल डान्स महिलांना अधिक पसंत असून त्यामुळे मूड सुधारण्यासही मदत होते.