कॉमेडियन बवली ही अभिनेत्री, डिजीटल प्लॅटफॉर्मवर दिसणार
अभिनेत्री यामी गौतम स्टॅण्ड अप कॉमेडियन अबिश मैथ्यूसोबत डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे.
नवी दिल्ली : अभिनेत्री यामी गौतम स्टॅण्ड अप कॉमेडियन अबिश मैथ्यूसोबत डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. 'सन ऑफ अबिश' नावाचा हा शो असणार आहे. शोच्या पहिल्या ३ भागात यामी गेस्टच्या भुमिकेत दिसणार आहे. कॉमेडियन केनी सेबस्टियनसोबत ती दिसणार आहे. 'अबिशचं चित्रिकरण हे माझ्यासाठी अविश्वसनीय अनुभव होता असल्याचं तिनं सांगितलं. डिजिटल प्लॅटफॉर्म हा खूप पारदर्शी असल्याचे मला वैयक्तिक वाटतय, कारण इथे त्वरित फिडबॅक मिळतो असेही तिने सांगितले.
ऋतिक कोस्टार
लोक थेट तुमच्याशी जोडले जातात. आज डिजिटल जगात खूप साधन सामुग्री असून ही एक रोमांचक वेळ आहे.
सध्या यामी ही अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्यासोबत 'बत्ती गुल मीटर चालू' सिनेमामध्ये व्यस्त आहे.
यामध्ये ती एका वकिलाच्या भूमिकेत दिसतेय. खूप मोठ्या काळानंतर यामी कोणत्या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत ऋतिक रोशन लीड रोलमध्ये दिसणार आहे.
शाहिदसोबतचा पहिला सिनेमा
सन ऑफ अबिशमध्ये ती पाहुणी म्हणून आली आहे. या शो चे शुट पूर्ण झालयं. 'बत्ती गुल मीटर चालू' हा शाहिद कपूरसोबतचा तिचा पहिला सिनेमा आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूर या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे शूटींग जलद गतीने होतयं. 'टॉयलेट एक प्रेमकथा' या सिनेमाचे दिग्दर्शक नारायण शर्मा हेच या सिनेमाचेही दिग्दर्शन करत आहेत.